
Nagpur News : डिझेलच्या किमतीत झालेली वाढ त्यासोबतच मजुरांची उपलब्धता न होणे आणि मजुरीतील वाढीच्या परिणामी २०२४-२५ या वर्षातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी आणि ऊस या पिकांसाठी सर्वाधिक हमीभावाची शिफारस गुजरात राज्याने केली आहे.
गुरुवारी (ता. ६) गुजरातमधील गांधीनगर येथे बैठक झाली. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिव, दमण, दादरा आणि नगर हवेली ही राज्ये बैठकीत सहभागी झाली. राज्यांद्वारे शिफारशीत हमीभाव आणि त्यामागील कारणे नोंदविण्यात आली होती.
कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा, सदस्य सचिव अनुपम मित्र यांच्यासह महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयातील विस्तार संचालक दिलीप झेंडे, अमरावती येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर उपस्थित होते. गुजरातच्या वतीने रब्बी हंगामातील गव्हाकरिता ३८५० दराची शिफारस करण्यात आली आहे.
डिझेलच्या दरातील वाढ, सिंचन सुविधांवर होणारा खर्च अशा बाबी या शिफारशीमागे गृहीत धरण्यात आल्या. हरभऱ्यासाठी ६७१० रुपयांचा हमीभाव सुचविण्यात आला. शेतीकामासाठी मजूर न मिळणे आणि मजुरी दरातील वाढीच्या पार्श्वभूमीवर असा दर सुचविला आहे.
उसाकरिता ५५० रुपये ‘एमएसपी’ शिफारस गुजरातने केली आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेवर झालेल्या परिणामाची दखल घेत दर सूचविण्यात आला आहे. मध्य प्रदेशने गव्हासाठी २४०० तर हरभऱ्याकरिता ५५०० रुपये हमीभावाची शिफारस केली.
२०२२-२३ मधील हमीभाव
गहू ः २१२५
हरभरा ः ५३३५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.