Rahul Gandhi Latest News: राहूल गांधी यांची खासदारकी रद्द; भाजपची सुडबुध्दीने कारवाई?

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून टिप्पणी केली होती.

त्यामुळे सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहूल गांधी यांना शिक्षा (Rahul Gandhi Disqualified As Member Of Loksabha) झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने आज (ता.२४) त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली. सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच जामीनही मंजूर केला होता.

Rahul Gandhi
Savarkar Rahul Gandhi : सावरकर नव्हे तर शेतकऱ्यांवर राहुल गांधींचा फोकस

न्यायालयाच्या निकालनंतर राहूल गांधी यांनी एक ट्विटही केले होते. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा ईश्वर आहे. अहिंसा हे यासाठीचं प्राप्त करण्याचं साधन, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : भारत जोडोला प्रतिसाद मिळतो का ?

न्यायालयाने राहूल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने आज (ता.२४) त्यांची खासदारकी रद्द केली. एखाद्या खासदाराला दोन किंवा दोनपेक्षा अधिक वर्षे शिक्षा झाल्यानंतर खासदारकी रद्द होईल, असा कायदा आहे. त्यानुसार राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचं सांगण्यात येते.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने सुडबुद्धीने राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे.

परंतु खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयामुळे राहुल गांधींना जनमानसातून सहानुभूती मिळेल, त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल आणि त्याचा राजकीय फायदा राहुल गांधी आणि कॉंग्रेसला होईल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी वरच्या कोर्टात अपिल केले आणि त्यांची शिक्षा रद्द झाली तरच राहूल गांधी यांची खासदारकी कायम राहू शकते, अशी माहिती कायद्यातील जाणकारांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com