
लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव (ता.पैठण) परिसरातील चार गावातील शेकडो हेक्टर शेतीला वरदान ठरणारी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना (Irrigation Scheme) टप्पा क्रमांक दोन भाग एकचे रखडलेले कामे सुरु करण्यासाठी तोंडोळी ग्रामपंचायत (Grampanchyat) सरपंच, सदस्य, पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैठण तालुक्यातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी मुळ ब्रम्हगव्हाण उपसा योजनेपासून वंचित लोहगाव तोंडोळी, जैनपूर, दिन्नापूर, धुपखेडा भागातील शेतीसाठी टप्पा क्रमांक एक तर दुसरा टप्पा बालानगर ते पाचोड गावांसाठी मंजूर करून सन २०१२ मध्ये कॅनाल, पंपगृह वितरण कक्षाचे कामे सुरू केले होते.
परंतु गेल्या काही वर्षांपासून हि कामे अर्धवट अवस्थेत पडली होती.
सदरील कामे लवकर सुरू करण्यासाठी तोडोंळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गरड यांनी वारंवार आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री व विद्यमान पालकमंत्री संदीपान भुमरे, मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे योजना पूर्ण करण्याची मागणी लावून धरली होती. त्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
सरपंच संजय गरड, उपसरपंच सुरेखा तांबे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर नरवडे, विष्णू शेळके, सीमा गरड, गुलशनबी पठाण, संगीता आगळे, रामचंद्र तांबे, वर्षा गरड, आदींनी पाटबंधारे
विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता याची भेट देऊन कामे सुरू करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अखेर या योजनेच्या कामाला पालकमंत्री संदीपान भुमरे, विलास भुमरे यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे योजनेच्या तोडोंळी, जैनपूर शिवारात कॅनालचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.