Hurda Party : जिल्हाधिकारी, जि. प. ‘सीईओं’नी घेतला शिवारात हुरड्याचा आस्वाद

शासनाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यात शेतकरीदेखील तृणधान्यासंबंधी जनजागृती, प्रक्रिया यासंबंधी सरसावले आहेत.
Hurda Party : जिल्हाधिकारी, जि. प. ‘सीईओं’नी  घेतला शिवारात हुरड्याचा आस्वाद

Rabi Jowar Season जळगाव ः शासनाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (International Millet Year) म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यात शेतकरीदेखील तृणधान्यासंबंधी जनजागृती (Millet Awareness), प्रक्रिया यासंबंधी सरसावले आहेत.

आसोदा (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांच्या आमंत्रणानुसार येथील जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ पंकज आशिया यांनी आसोदा शिवारात जाऊन हुरडा पार्टीचा आनंद घेतला.

Hurda Party : जिल्हाधिकारी, जि. प. ‘सीईओं’नी  घेतला शिवारात हुरड्याचा आस्वाद
Jowar Sowing : ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात घट

नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कृषी विभाग व आत्माचे संबंधित कर्मचारी अधिकारीदेखील सहभागी झाले. नवनिर्मिती शेतकरी विज्ञान मंडळाचे शेतकरी किशोर चौधरी, भादली येथील सरपंच मिलिंद चौधरी, शरद नारखेडे, परेश लोखंडे, संजय पाटील आदी शेतकऱ्यांनी या हुरडा पार्टीचे संयोजन केले.

Hurda Party : जिल्हाधिकारी, जि. प. ‘सीईओं’नी  घेतला शिवारात हुरड्याचा आस्वाद
Rabi Jowar : रब्बीत गल्ले बोरगाव हे ‘सुपर मोती’चे करा

थेट दादर ज्वारीच्या शेतात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी मित्तल व सीईओ आशिया यांनी हुरड्याचा अस्वाद घेतला. दादर ज्वारी, पारंपरिक तृणधान्य महत्त्वाचे आहे.

त्याचा प्रसार व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे, असे जिल्हाधिकारी मित्तल व सीईओ आशिया म्हणाले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अनिल भोकरे, ‘आत्मा’चे उपसंचालक कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, शिवाजी राऊत, आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com