Cold Storage Electricity : भरमसाट वीज दरवाढीने ‘कोल्ड स्टोअरेज’ ‘तापले’!

राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलात महावितरण कंपनीने यंदा एक एप्रिलपासून ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
Electricity
ElectricityAgrowon

Pune News राज्यभरातील शीतगृहांच्या (Cold Storage) वीजबिलात महावितरण कंपनीने यंदा एक एप्रिलपासून ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तर पुढील वर्षी ही वाढ ५० टक्क्यांपर्यंत प्रस्तावित असल्याने शीतगृहांपुढे मोठे संकट ओढवले आहे.

राज्यातील अन्न साठवणूक व अन्न प्रक्रिया उद्योगावरही (Food Processing Industry) याचा मोठा परिणाम होणार आहे. नव्या दरवाढीनुसार (Electricity Rate) एप्रिल महिन्याचे बिलही आल्याने शीतगृहमालकांचे धाबे दणाणले आहे. सदर दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी महा कोल्ड स्टोअरेज आणि नवी मुंबई असोसिएशनने केली आहे.

‘महावितरण’च्या मल्टी इयर टेरिफ ऑर्डरनुसार शीतगृहासाठीच्या पाच वर्षांकरिता निर्धारित वीजदरात दरवर्षी ठरल्याप्रमाणे वाढ केली जाते.

गेले तीन वर्षे याचे पालन करण्यात आले. मात्र यंदा मध्यंतरी ‘महावितरण’ने अचानक बदल करत अधिकच्या वीज दरवाढीबाबत प्रस्ताव राज्य वीज आयोगाकडे सादर केला. यावर असोसिएशनने २३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोगापुढे आपली हरकत नोंदवली होती.

टेरिफ ऑर्डरनुसार २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये शीतगृहांसाठीच्या वीजदरात वाढ केली जावी, अशी संघटनेची भूमिका आहे. मात्र ‘महावितरण’ने प्रस्तावित दरवाढीपेक्षाही पुढे जात आयोगाने त्याहीपेक्षा अधिक दरवाढ करून सर्वांनाच धक्का दिला.

Electricity
Electricity Problem In Sangli : कृषिपंपाची दिवस-रात्रीची वीज होतेय ‘गुल’

अत्यावश्‍यक सेवा या सदरात शीतगृहे मोडतात, वातानुकूल यंत्रणेवर चालणाऱ्या शीतगृहांच्या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च विजेवरच होतो, त्यामुळे ‘महावितरण’ने केलेली दरवाढ शीतगृहांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणारी आहे.

या व्यवस्थेवर विसंबून शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजकांनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

दरवाढ मागे घ्यावी व पूर्वीच्या टेरिफप्रमाणे नियमित करावी अशी मागणी महाकोल्ड स्टोअरेज असोसिएशनचे अध्यक्ष राजकिशोर केंडे आणि नवी मुंबई कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष लालजी सावला यांनी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या दरवाढीविरोधात संघटनेने वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे.

Electricity
Electricity Theft : राज्यात तीन दिवसांत ३८३ वीजचोऱ्या उघडकीस

‘‘मल्टी इयर टेरिफ ऑर्डरनुसार पाच वर्षांकरिताची वीज दरवाढ निश्‍चित करण्यात आली होती. मात्र अवघी तीन वर्षे झालेली असतानाच ‘महावितरण’ने मध्येच पुनःदरवाढीचा अर्ज वीज नियामक आयोगाकडे सादर केला, त्यास मान्यता मिळल्यामुळे राज्यातील शीतगृहचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. सरकारने ही दरवाढ करू नये, अशी आमची मागणी आहे.’’

- राजकिशोर केंडे, अध्यक्ष महा कोल्ड स्टोअरेज असोसिएशन, पुणे

...अशी झाली वीज दरवाढ (रुपये)

२०२३-२४

प्रकार : नियमित प्रस्तावित ------- महावितरण बदल ------- आयोग अंतिम

एचटी : ५.६४ ----------------- ६.८४ (२१ टक्के वाढ)------- ७.८७ (३९ टक्के वाढ)

एलटी : ४.६६------------------ ५.९३ (२७ टक्के वाढ) ------ ६.२३ (३४ टक्के वाढ)

२०२४-२५

प्रकार : नियमित प्रस्तावित ------- महावितरण बदल ------- आयोग अंतिम

एचटी : ५.६४------------------७.४४ (३२.१५ टक्के वाढ)---- ८.५९(५३ टक्के वाढ)

एलटी : ४.६२------------------ ६.५४(४१.५६ टक्के वाढ)---- ६.८८ (४९ टक्के वाढ)

शेतकऱ्यांपासून ग्राहकांनाही फटका

राज्यात सुमारे ‘मल्टी’ आणि ‘सिंगल’ सुविधांचे सुमारे २५०वर कोल्ड स्टोअरेज आहेत. याद्वारे शेतकरी, अन्न प्रक्रिया आणि साठवणूक व्यावसायिकांना सेवा पुरविली जाते. शेतीमाल, भाजीपाला, फळे, सुकामेवा, कडधान्ये, बियाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ आदींची साठवणूक येथे होते. नव्या दरवाढीमुळे या सर्वांसह थेट ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com