Weather Update : ‘उजनी’ पाणलोट क्षेत्र गारठले

ढगाळ वातावरण सध्या गायब होऊन गेल्या दोन-तीन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर, करमाळा तालुक्यात विशेषतः उजनी पाणलोट परिसरात नागरिकांना अक्षरशः हुडहुडी भरत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

केत्तूर : राज्याच्या वातावरणात (Weather update) सतत चढ-उतार होत आहेत. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) परंतु ढगाळ वातावरण सध्या गायब होऊन गेल्या दोन-तीन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची (Winter Cold Wave) तीव्र लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर, करमाळा तालुक्यात विशेषतः उजनी पाणलोट परिसरात नागरिकांना अक्षरशः हुडहुडी भरत आहे.

या परिसरातील किमान तापमानात घट झाल्याने वातावरणाचा पारा १३ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नागरिक गारठून चालले आहेत.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने राजस्थानकडून थंडगार वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दरवर्षी संक्रांतीनंतर थंडी कमी होत असते.

परंतु या वर्षी संक्रातीनंतर थंडी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. वाढणाऱ्या थंडीमुळे तरकारी (भाजीपाला) पिके तसेच रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांना ही थंडी लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले सांगितले.

Weather Update
Cold Weather :राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज

थंडी वाढल्याने या वर्षी प्रथमच स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे मफलर, जर्कीन गाठोड्यातून बाहेर आले आहेत. तर काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. थंडी वाढू लागल्याने थंडीचा आनंद नागरिक घेत आहेत. वाढणाऱ्या थंडीतही ऊसतोड मजूर मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार वाजताच बैलजोडी जुंपून कारखाना सोडत आहेत.

दरम्यान, पहाटे पाच-साडेपाच वाजण्याच्या दरम्यान उसावर सपासप वार करीत ऊसतोड करून पुन्हा वेळेत कारखाना गाठण्यासाठी धावपळ करीत आहेत. थंडीमुळे माशाचे दर वाढत असताना उजनी जलाशयात मासे सापडण्याचे प्रमाण अल्प झाल्याने मच्छीमार बांधव संकटात आले आहेत. बाजारपेठा रात्री लवकर बंद होत आहेत. तर सकाळी उशिराने सुरू होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com