Rabi Irrigation : चार धरणांतून पाण्याचे आवर्तन बंद

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी चार धरणांतून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन जलसंपदा विभागाने बंद केले आहे.
Chas Kaman Dam
Chas Kaman DamAgrowon
Published on
Updated on

पुणे : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मागणी (Water Demand) लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी (Rabi Season) चार धरणांतून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन (Rabi Irrigation) जलसंपदा विभागाने (Department Of Water Resources) बंद केले आहे.

यात माणिकडोह, चिल्हेवाडी, भामा आसखेड आणि घोड धरणांतील आवर्तनाचा समावेश आहे. सध्या सात धरणांतून पाण्याचे आवर्तन सुरू असून यापुढील काळात शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा लागणार आहे.

Chas Kaman Dam
Rabi Irrigation : ‘कडवा’, भोजापूर’मधून रब्बीसाठी आवर्तन

सध्या रब्बी हंगामातील विविध पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांसाठी पाण्याची अडचण येऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील अकरा धरणांतून गेल्या महिनाभरापासून पाणी सोडण्यात आले होते.

डावा व उजवा अशा दोन्ही कालव्यांस पाण्याचे आवर्तन सोडल्याने याचा फायदा आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांना झाला आहे.

पावसाळ्यात पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिले होते. जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता.

गेल्या तीन महिन्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने आता धरणांत १५६.२६ टीएमसी म्हणजेच ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून जवळपास ११ धरणांतून पाणी सोडले होते. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.

Chas Kaman Dam
Rabi Irrigation : अकरा धरणांतून रब्बीसाठी आवर्तन

पूर्व भागातील शेतकरी डावा, उजवा कालव्यातील पाण्यावर विविध पिके घेतात. यंदाही शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफुल, मका, फळबागा घेतल्या आहेत. याशिवाय कांदा, बटाटे, भाजीपाला याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

वातावरणाच्या अनियमितपणामुळे विहीर व कूपनलिका यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तसेच कालव्यालागत असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा यावर अवलंबून आहे.

त्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने या धरणांतील पाण्यावर शेतकरी अवलंबून असतो. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला योग्य ते नियोजन करत आहे.

याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांना बंद जलवाहिनेद्वारे पाणीपुरवरठा करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.

धरणनिहाय सुरू पाण्याचे आवर्तन, क्युसेकमध्ये

धरण --- डावा कालवा -- उजवा कालवा

डिंभे --- ६०० --- २००

वीर --- ८२७ --- १५५०

उजनी --- १४०० --- १६००

पिंपळगाव जोगे -- २६५ --- -

येडगाव --- १४०० --- -

चासकमान --- ५५० --- -

खडकवासला --- - --- ९०५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com