Food Processing Industry : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात छ. संभाजीनगर क्रमांक एक

Micro Food Processing Industry : केंद्र शासनसहायित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमइ) योजने अंतर्गत सर्वाधिक लाभार्थ्यांना अर्थसाह्य देऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.
Food Processing Industry
Food Processing Industry Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : केंद्र शासनसहायित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमइ) योजने अंतर्गत (PMFME Scheme) सर्वाधिक लाभार्थ्यांना अर्थसाह्य देऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. या योजनेमध्ये देशातील प्रथम दहा जिल्ह्यांत महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे हे विशेष.

केंद्र शासनाच्या सहकार्यातून पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जाते. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत या योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी आराखडा मंजूर झालेला आहे. सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी योजनेतून ३५ टक्के अनुदान दिले जाते.

Food Processing Industry
Food Conservation Process : अन्नपदार्थांच्या पिकलिंग आणि कॅनिंगचे फायदे काय आहेत?

जवळपास दहा लाखांपर्यंतचा प्रकल्प या योजनेतून सादर करता येऊ शकतो. छोट्या प्रकल्प एनपीएमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बँकाही मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सादर झालेल्या प्रस्तावांपैकी ८६८ प्रस्तावांना अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

सरासरी साधारणतः ७० हजार रुपये किमान प्रकल्प उभारणीत देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो, कांदा, आले, हळद आदी फळभाज्यांवर सोलार ड्रायरद्वारे प्रक्रिया करणारे छोटे उद्योग जिल्ह्यात उभे राहून खास करून महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

Food Processing Industry
Food Processing : 'पीएमएफएमई' अंतर्गत ४९ कोटींचे प्रस्ताव मंजू

शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक आहे. टोमॅटो, आले, हळद, कांदा आदी फळभाज्यांवर सोलार ड्रायरद्वारे प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात झपाट्याने वाढले आहेत. अनेकांच्या हातांना रोजगार मिळाला. लक्षांक कमी असला तरी त्यापेक्षा जास्त प्रकल्प मंजूर करता येत असल्याने हे शक्य झाले.

- दत्तात्रेय दिवटे, कृषी उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर.

‘पीएमएफएमइ’ अंतर्गत देशातील

पहिले १० जिल्हे, मंजूर प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर...८६८

सिमला...६८४

बेळगाव...३८३

पुणे...३६७

सांगली...३६५

सातारा...२९०

नगर...२७१

नाशिक...२७०

तिरुअनंतपुरम...२६४

सोलापूर...२६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com