
Maharashtra CM Fund : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथून मुंबईच्या दिशेने शेतकरी लाँग मार्च (Kisan Long March) निघाला होता. या आंदोलनात पायी चालणाऱ्या एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer Death) झाला होता.
या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावाच्या पुंडलिक अंबादास जाधव या शेतकऱ्या लाँग मार्च दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना ५ लाखांच्या मदत देण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली होती.
त्यानुसार आज या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. मृत शेतकरी पुंडलिक जाधव यांच्या पत्नी आणि मुलाकडे मुख्यमंत्र्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतना शिंदे म्हणाले की, आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात लाँग मार्च काढला होता. परंतु या मार्चदरम्यान एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू झाला.
या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडता कामा नये. त्याचे कुटूंब उघड्यावर पडू नये, म्हणून आमच्या संवेदनशील सरकराने पाच लाखांची मदत केली आहे, आणि भविष्यातही काही अडचणी आल्यास सरकार म्हणून पाठीशी उभे राहू, असेही शिंदे म्हणाले.
८६१ विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप मंजूर
गेल्या काही दिवसांपासून बार्टीच्या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यी आंदोलनाला बसले होते. बार्टीने पात्र ठवलेल्या अनुसूचित जातींमधील ८६१ संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी पैसे नसल्याची बाब समोर आली आहे.
या प्रश्नी पण महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे यासाठी सुमारे दीड महिना फेलोशिपसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु होते.
या प्रश्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती औचित्य साधत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासाठी २०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
इंदू मिल स्मारकाचे काम युध्द पातळीवर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे स्मारकाचे काम राज्य सरकार करत आहे. या स्मारकाचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.
तसेच इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची पाहणी डॉ. आंबेडकरांचे नातेवाईक आणि तज्ज्ञांच्या समितीने केली आहे.
हे स्मारक जागतिक दर्जाचे होईल. जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक आपण करत असल्याचे शिंदे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.