Chandrayaan-3 : चांद्रयान 3 चंद्राच्या शेवटच्या कक्षेत; लँडर आज वेगळा होणार

Chandrayaan-3 Latest Update: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3 चं प्रक्षेपण करून महिना झाला. आता हे यान अतिशय महत्त्वाच्या वळणावर पोहोचले आहे.
Chandrayaan-3
Chandrayaan-3 Agrowon

ISRO Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी आणि सर्व जगाचे लक्ष वेधलेली चांद्रयान-३ मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यानाने बुधवारी (ता. १६) सकाळी साडेआठच्या सुमारास चंद्राच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला. आता सर्व कक्षा बदल पूर्ण झाले असून यान चंद्रावर उतरविण्याची तयारी ‘इस्रो’त सुरू झाली आहे.

Chandrayaan-3
नव्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम यशस्वी; लष्करी उपग्रहासह दोन उपग्रहांचे प्रक्षेपण

यान चंद्रापासून १५३x१६३ किलोमीटर अंतरावरील कक्षेत आहे. बुधवारी (ता. १६) चंद्राच्या शेवटच्या कक्षेत स्थापन करण्यास यश आले असून या लहान कक्षेतील परिभ्रमणानंतर प्रपोल्शन मोड्युल आणि लँडर मोड्युल विभक्त करण्याचा टप्पा सुरू होणार आहे,’’असे ट्विट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केले आहे.

Chandrayaan-3
‘इस्रो’ची अवकाशात तेजोमय भरारी

नियोजनानुसार गुरुवारी (ता. १७) मुख्य यानापासून लँडर वेगळा केला जाणार आहे. यावेळी दोन्ही मोड्युल चंद्राच्या चारही बाजूंनी १००x१०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत असतील. गुरुवारी दुपारी पावणेचार ते चार या वेळेत लँडर वेगळा होईल. यानंतर २३ ऑगस्टला लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरणार आहे.

‘इस्रो’ची खबरदारी

चंद्राच्या पृष्ठभागावर यान अलगदपणे उतरल्यास भारतासाठी ती अत्यंत गौरवास्पद कामगिरी ठरेल. अशी कामगिरी करणारे अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. यान चंद्रावर अलगद आणि सुरक्षितपणे उतरण्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. यानाच्या रचनेत अनेक इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक उपप्रणालींचा समावेश केलेला आहे. दिशादर्शन आणि नियंत्रण प्रणाली, प्रपोल्शन प्रणाली आणि संचार संवेदक आदींचा समावेश त्यात आहे. रोव्हर वेगळा करण्यासाठी प्रणाली, दोन्ही बाजूंकडून दळणवळणासाठी अँटेना आणि यानातील इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com