Agriculture Sell Chain : शेतीमालाचे ब्रॅडिंग करून विक्रीची साखळी उभी करावी

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमालाचे ब्रॅंडिग करून देशांतर्गतसह जगभरात विक्रीची साखळी उभी करणे आवश्यक आहे.
Agriculture News
Agriculture News Agrowon

Sangli News ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमालाचे ब्रॅंडिग (Agriculture Branding) करून देशांतर्गतसह जगभरात विक्रीची साखळी (Agriculture Produce Sale Chain) उभी करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

सांगली येथील नेमिनाथनगर येथे जिल्हा कृषी विभाग (Agriculture Department) आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सवाचे (Agriculture Festival) उद्‍घाटन शनिवारी (ता. १८) शेतकरी बसवराज कुंभार धनश्री खोत, शिल्पा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते झाले.

या वेळी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, जतचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, विट्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, प्रकल्प उपसंचालक बाळासाहेब लांडगे, आदी उपस्थित होते.

Agriculture News
Agriculture Tractor : कृषी यांत्रिककीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की कृषी विभागाकडून विविध योजना राबवत आहेत. शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्हा कृषी महोत्सव सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.

या मोहोत्सवामुळे शेती विकासाला चालना मिळण्यास मदत मिळेल. शेतकऱ्यांनी देशांसह जगभरातील बाजारपेठेत शेतीमालाची विक्री करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी ब्रॅंडिग करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.

Agriculture News
Agriculture Festival : शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्षांनी एकजूट दाखवावी

प्रकाश सूर्यवंशी म्हणाले, की या कृषी महोत्सवामुळे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी यांच्या विचारांची देवाणघेवाण होणार आहे. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या या माध्यमातून सुटणार आहेत. शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याने शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीस मदत होईल. शासकीय योजनांबाबत माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.

कृषी महोत्सवामध्ये सेंद्रिय भाजीपाला, खपली गहू, शिराळ्याचा तांदूळ, यासह शासकीय रोपवाटिकेतील विविध फळांची रोपे विक्रीस ठेवली आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी चर्चासत्रही सुरू केले आहे. भगवान माने यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com