Sugar Stocks : सणासुदीमुळे केंद्राने साखरेचा कोटा वाढवला ; ऑगस्टसाठी 2 लाख टनांचा अतिरिक्त विक्री कोटा

Sugar Stocks Limit : सणासुदीच्या काळात बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्राने साखरचा कोटा वाढवला आहे. ऑगस्टसाठी दोन लाख टनांचा अतिरिक्त विक्री कोटा जाहीर करण्यात आले.
Stock Limit
Stock Limitagrowon

Kolhapur News : येत्या काही दिवसांत येणाऱ्या सणासुदीच्या हंगामात लागणारी साखरेची निकड लक्षात घेता केंद्राने देशातील साखर कारखान्यांना मंगळवारी (ता. २२) ऑगस्टसाठी दोन लाख टनांचा अतिरिक्त विक्री कोटा जाहीर केला.

बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्राने हा कोटा जाहीर केला. या कोट्यामुळे ऑगस्टमध्ये केंद्राने दिलेला विक्री कोटा २५.५० लाख टनांचा झाला आहे. या पूर्वी या महिन्यासाठी २३.५० लाख टनांचा कोटा दिला होता. गेल्या वर्षीच्या ऑगस्टपेक्षा हा कोटा साडेतीन लाख टनांनी जास्त आहे.

Stock Limit
Sugar Mills : साखर कारखान्यांची उद्दिष्टपूर्तीसाठी धडपड होणार

सध्या टोमॅटो व कांद्याच्या दरवाढीमुळे अडचण निर्माण झाली आहे. हे साखरेच्या बाबतीत घडू नये यासाठी केंद्राने सावधगिरीचा उपाय म्हणून साखरेच्या विक्री कोट्यात वाढ केली आहे. हा कोटा ३१ ऑगस्टपर्यंतच विक्री करावा, अशा स्पष्ट सूचना केंद्राने केल्या आहेत.

कोटा ऑगस्टच्या शेवटी जाहीर केला असला तरी कोट्याच्या साखर विक्रीसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. जे साखर कारखाने साखरविक्री करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असेही केंद्राने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने साखरेच्या विक्रीबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत साखरेची भाव वाढ होऊ नये, यासाठी केंद्राने कारखान्यावर निर्बंध टाकण्यास सुरुवात केली. कारखान्यांनी सर्व माहिती ऑनलाईन भरायची सक्तीही केंद्राने काही दिवसांपूर्वी केली होती. टोमॅटो व कांद्याच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये रोष आहे.

वेळीच उपायोजना न केल्याने या वस्तूंचे भाव वाढले, असा आरोप केंद्रावर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने साखरेच्या बाबतीतही कारखान्यांच्या साखर विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या ऑगस्टमध्ये जादा कोटा दिल्याने साखरेची टंचाई बाजारात होणार नाही व दरही स्थिर राहतील, असा केंद्राचा अंदाज आहे.

सध्या स्थानिक बाजारात साखरेचे दर ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. ते आणखी वाढतील या भीतीपोटी केंद्राने ऑगस्ट संपायला आठ दिवस बाकी असतानाच पुन्हा दोन लाख टनांचा कोटा जाहीर केला.

Stock Limit
Raju Shetti Meets Nitin Gadkari : राजू शेट्टींनी घेतली नितीन गडकरींची भेट, साखर निर्यात धोरणावर निर्णय घेण्याची मागणी

महाराष्ट्राला ६५७१७ टनांचा कोटा

वाढीव दोन लाख टन कोट्यापैकी उत्तर प्रदेशला सर्वाधिक ६९ हजार १०५ टनांचा कोटा दिला आहे. या खालोखाल महाराष्ट्राला ६५ हजार ७१७ टनांचा कोटा दिला आहे. कर्नाटकाला ३० हजार टन साखर विक्रीचे उद्दिष्ट दिले आहे.

कारखान्यांना धावपळ करावी लागणार

ज्या साखर कारखान्यांनी अद्याप दिलेल्या कोट्यापर्यंत साखरविक्री केली नाही, त्यांच्यापुढे नव्या कोट्यासहित साखरविक्री करण्याचे मोठे आव्हान आहे. ही साखर सरेंडर करू शकत नसल्याने येत्या आठ दिवसांत कोणत्याही परिस्थितीत दिलेला साखरकोटा विक्री करावाच लागणार आहे.

ऑगस्टच्या साखरविक्री कोट्याला सप्टेंबरमध्ये मुदतवाढ देणार नसल्याचेही केंद्राने सांगितले आहे. यामुळे कारखान्यांना जलद हालचाली कराव्या लागणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com