Cattle Wealth Insurance : मोठी बातमी! पिक विम्याप्रमाणे आता पशुधन विमा राबवण्याचा विचार

Pashudhan Insurance : राज्यात आता पशुधनासाठीही विमा योजना राबण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती समोर आली आहे.
cattle wealth insurance
cattle wealth insuranceagrowon
Published on: 
Updated on: 

Cattle Wealth Insurance : पिकांचे नुकसान झाल्यास बाधीत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळत असतो. दरम्यान याच धर्तीवर राज्यात आता पशुधनासाठीही विमा योजना राबवण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत राज्यसरकारकडून त्यादृष्टीने विमा कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. ही योजना अस्तित्वात आली तर राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागच्या दोन वर्षांपासून देशासह राज्यभरात लम्पी रोगामुळे अनेक जनावरे दगावली यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

दरम्यान याबाबत राज्य शासनाकडून लम्पीने जनावरांचा मृत्यू झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. याचबरोबर जनावरांना याची पुन्हा लागण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणही केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर पशूंच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला असून, विम्याद्वारे पशुपालकांना संरक्षण देता येईल का, असा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

cattle wealth insurance
Crop Insurance: पीकविमा योजनेत मोठे बदल; फायदा शेतकऱ्यांचा कि कंपन्यांचा? | Agrowon| ॲग्रोवन

यापूर्वी पशुधन विमा योजना राबविली जात होती. मात्र, या योजनेला मर्यादा असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. यामुळे राज्यात शेतकर्‍यांसाठी एक रुपयात कृषी पीक विमा योजना लागू केली आहे, त्याच धर्तीवर पशुधनासाठीही विमा योजना सुरू करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

महाराष्ट्रात २०१९ साली पशुगणना करण्यात आली होती यामध्ये ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधनाची असल्याची माहिती समोर आलीय. यापूर्वी १९९७ साली पशुधनाची संख्या ४ कोटी होती. दरम्यान मागच्या २० वर्षात ही संख्या घटल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांत वर्षभरात ८१ लाख १० हजार जनावरांवर उपचार करण्यात आल्याची आकडेवारी आहे.

सध्या पशुधनात विमा योजनेत भारतात महाराष्ट्रा सातवा क्रमांक लागतो. यामध्ये गाय आणि बैल संवर्गातील पशुधन दिले जाते. यामध्ये १ कोटी ३९ लाख ९३ हजार पशुधन विमा देण्याच आला आहे.

तर म्हैस, रेडा संवर्गातील पशुधन ५६ लाख ४ हजार रूपये देण्यात आला. शेळी, मेंढी संवर्गातील १ कोटी ३२ लाख ८५ हजार पशुधन देण्यात आले. याचबरोबर इतर संवर्गातील पशुधन १ लाख ९८ हजार देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com