Cashew Seed : ‘काजू बी’झाले लहान

हवामान बदल, किडींचा परिणाम; शेतकऱ्यांना फटका
Cashew Seed
Cashew SeedAgrowon
Published on
Updated on

रत्नागिरी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उन्हाच्या तडाख्याचा परिणाम यंदा काजू हंगामावर (Cashew season) झाला आहे. हवामानातील बदलामुळे यंदा काजू बी (cashew seed) चा आकार लहान झाला आहे.

वजन घटले आहे. पूर्वी एका किलोमध्ये १५० बी असायच्या. आता आकार लहान झाल्याने २०० ते २२५ बी रहातात.

बाजारपेठेत दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत खाली आला आहेत. यामुळे काजू बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

कोकणात गावठी काजूबरोबर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘वेंगुर्ला ४’ आणि ‘वेंगुर्ला ५’ या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.

यंदा काजूवर सुरुवातीपासून फुलकिडे, ‘टी मॉस्कुटो’ किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे कीडनाशक फवारणीच्या खर्चात वाढ झाली.

किडीच्या प्रादुर्भावामुळे काजू बी च्या टरफलावर काळे डाग पडले. तसेच बीचा आकार कमी झाला आहे.

Cashew Seed
Cashew Rate : काजू बीच्या दरात का होतेय घसरण?

‘वेंगुर्ला काजू बी’ म्हटले की काऊंट पाहूनच खरेदी
यंदा वाळलेली काजू बी फेब्रुवारीपासूनच बाजारात आली. सुरवातीला १३० ते १३५ रुपये किलो दर होता. सध्या १०० ते १०५ रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

मोठी बी असेल तरच प्रति किलोस ११० ते ११५ रुपये दर मिळतो. परंतु खरेदीदार ‘वेंगुर्ला काजू बी’ म्हटले की काऊंट पाहूनच खरेदी करु लागला आहे.

सरसकट बी दिली तर प्रति किलोस शंभर रुपयेच दर मिळतो. दोन वर्षांपूर्वी काजू बीला १५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता.

Cashew Seed
Cashew Nut Rate : काजू बी दर घसरणीविरोधात उत्पादकांचा वैभववाडीत मोर्चा

यंदा हवामान बदलाचा काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. कीडनाशक फवारणी, वाढलेली मजुरी, यासह पीक व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
- परेश सुपल, काजू बागायतदार, रत्नागिरी.

काजू कलमांना वाढीच्या टप्यानुसार योग्य वेळेत अन्नद्रव्यांचा पुरवठा झाला नसल्याने वाढ मर्यादित होते. त्याचा परिणाम बी उत्पादन आणि आकारावर होतो. यंदा प्रतिकूल हवामानामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव देखील वाढला. त्याचाही काजू बी उत्पादनावर परिणाम दिसून आला आहे.
- डॉ. वैभव शिंदे, सहयोगी प्राध्यापक,
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com