Beekeeping : मधुमक्षिका पालनासाठीनिवडक जिल्ह्यांत अभियान

Honey Bee Farming : राज्यात शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालनाकडे वळण्यासाठी कृषी विभागाने काही जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान हाती घेतले आहे.
Beekeeping
BeekeepingAgrowon

Pune News : राज्यात शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालनाकडे वळण्यासाठी कृषी विभागाने काही जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान हाती घेतले आहे. राज्यात व राज्याबाहेर शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळण्यासाठी अंदाजे २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

फलोत्पादन विभागाने एकूण चार टप्प्यांत अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिकमध्ये तीन लाख रुपये खर्च करून राज्यस्तरीय परिसंवाद घेतला जात आहे.

याशिवाय सातारा, लातूर, अमरावती व नागपूरमध्ये आठ लाख रुपये खर्च करून विभागीय परिसंवाद घेतली जातील. यवतमाळ, लातूर, पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात मधुमक्षिकापालनासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून उत्सुकता दर्शविली जाते आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा लाख रुपये खर्च करून राज्याबाहेर प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Beekeeping
Beekeeping business : शेतकऱ्यांनी मधाचे गाव तयार करावे

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले की, येत्या २० मे राजी जागतिक मधुमक्षिका दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. याशिवाय राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान हाती घेण्यासाठी निवड जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृती कार्यक्रमासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी महाबळेश्वरच्या मध संचालनालयाची मदत घेण्यात येत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात अभियान राबविण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान, भारतातील पहिले मधुमक्षिका पर्यटन केंद्र नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे आकाराला आहे.

Beekeeping
Beekeeping : जंगली फुलोरी मधमाश्‍यांसाठी विकसित केली वैशिष्ट्यपूर्ण मधपेटी

ग्रामीण व कृषी पर्यटनात काम करणाऱ्या ग्रीनझोन अॅग्रोकेम कंपनी त्यात आता मधुमक्षिका क्षेत्राचा समावेश करीत राज्यातील मधुमक्षिकापालकांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या संस्थेने मधुमक्षिका क्षेत्रासाठी मधुक्रांती नावाने चळवळ हाती घेतली आहे.

राज्यात मधुमक्षिका पालनाला अफाट संधी आहे. कृषी विभाग व आम्ही या क्षेत्रातील संधी नावीन्यपूर्ण मार्गाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी धडपडत आहोत. त्यामुळे मधुमक्षिकापालनातील उद्योजकता विकास वाढू शकतो. त्यासाठी या विषयावर देशातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांसाठी परिसंवाद घडवून आणले जात आहेत.
- संजय पवार, संचालक, बसवंत हनीबी पार्क

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com