Sugar Industry : साखर उद्योगावर ब्राझीलचे तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

Sugar Market : सकाळी साडेअकरा वाजता हे चर्चासत्र सुरु होईल. कंपनीच्या तज्ज्ञांच्या पोर्तुगीज भाषेतील सादरीकरणाचे तसेच चर्चा व प्रश्नोत्तरांचे मराठी भाषांतर करण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे.
Conference on Sugar Industry
Conference on Sugar Industry Agrowon

Solapur News : ‘‘महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी तांत्रिक चर्चासत्र दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे १२ ऑगस्टला पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले आहे,’’ अशी माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

Conference on Sugar Industry
Sugar Industry : साखर उद्योगाच्या निर्णयांबाबत केंद्राकडून स्वतःचीच पाठथोपटणी

सकाळी साडेअकरा वाजता हे चर्चासत्र सुरु होईल. कंपनीच्या तज्ज्ञांच्या पोर्तुगीज भाषेतील सादरीकरणाचे तसेच चर्चा व प्रश्नोत्तरांचे मराठी भाषांतर करण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे.

‘व्हीएसआय’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार जयंत पाटील यावेळी उपस्थित राहतील. या चर्चासत्रात ब्राझीलमधील ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणाली व बायोसीएनजीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची त्या देशातील तज्ज्ञांची सादरीकरणे होतील.

Conference on Sugar Industry
Sugar Industry : साखरेच्या किमान विक्रीदरामुळे साखर उद्योगाचा भ्रमनिरास

शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस कारखान्यांमध्ये येतो, त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट देखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळला जातो.

त्यामुळे कारखान्यांनी बसविलेल्या महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते. त्याचा गाळप क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन साखर उताऱ्यावर देखील प्रतिकूल परिणाम दिसून येतो.

सध्या बऱ्याच प्रमाणात ऊसतोडणी यंत्रामार्फत झालेल्या ऊसतोडीमध्ये धसकटांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता जून महिन्यात राष्ट्रीय सहकारी महासंघाने ब्राझीलमध्ये साखर उद्योगाचा अभ्यास दौरा केला होता.

त्यावेळी ‘जनरल चेंन्स दा ब्राझील’ या कंपनीकडे ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. या प्रणालीचा यशस्वी वापर होत असलेल्या तेथील कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन खात्री केल्यानंतर या कंपनीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com