Kharif Season 2023 : कपाशी बियाण्यांचा काळाबाजार ; विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी

Cotton Seed Black Market : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे. अशातच पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठीही शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Kharif Season Update : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी सध्या वेग घेतला आहे. अशातच पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठीही शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

याचाच फायदा काही बियाणे विक्रेत घेत असल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात समोर आला आहे.

कृषी सेवा केंद्र आणि कंपनीच्या डीलरकडून मोठ्या प्रमाणात कपाशी बियाण्यांचा काळाबाजार होत होत आहे. त्यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

राज्यात येत्या खरिपात कपाशी लागवड क्षेत्रातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कपाशी बियाण्यांचा पुरवठा एक जूननंतरच करावा, असे आदेश कृषी संचालक विकास पाटील (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांनी दिले आहेत. मात्र, कृषी सेवा केंद्र आणि इतर किरकोळ विक्रेत्यांकडे कपाशी बियाणे वेळेआधिच उपलब्ध झाले आहे.

Cotton Seed
Desi Cotton Seed Shortage : देशी, सरळ कापूस वाणांची टंचाई वाढणार

सरकारी आदेशाचे कारण देत कृषी सेवा केंद्र चालकांकडून किमतीपेक्षा जादा दराने बियाण्यांची विक्री केली जात आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये कपाशी बियाण्याची बॅग ८५३ रुपयांना मिळते. मात्र, काळ्या बाजारात हीच बॅग शेतकऱ्यांना १२०० ते १५०० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना किमतीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. तसेच बियाणे खरेदीनंतर शेतकऱ्यांना बिलेही दिली जात नाहीत. त्यामुळे सरकारी आदेशाला झुगारात सर्रास काळ्या बाजारात कपाशी बियाण्यांची सुरू असल्याचे चित्र आहे.

Cotton Seed
Cotton Seed Rate : बीटी कापूस बियाणे दरात केंद्राकडून मोठी वाढ

दरम्यान, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदतही शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचलेली नाही. त्यामुळे आगामी खरीपात पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशातही कृषी सेवा केंद्र आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांच्या असहायतेच्या फायदा घेतला जात आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या आणि कपाशी बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी केली आहे.

बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. तसेच संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com