Solapur BJP : `नियोजन`वर भाजपचा वरचष्मा

जिल्हा नियोजन समितीवर २० सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीत सर्वाधिक १४ सदस्यांच्या नियुक्त्या करत भारतीय जनता पक्षाने आपला वरचष्मा ठेवला आहे.
Solapur BJP
Solapur BJPAgrowon

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीवर (0Solapur District Planning Committee) २० सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीत सर्वाधिक १४ सदस्यांच्या नियुक्त्या करत भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला वरचष्मा ठेवला आहे. तर शिंदे गटाला (Shinde Group) सहा सदस्यांचा कोटा देण्यात आला आहे.

संपूर्ण नियोजन समितीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे या दोन आमदारांचा समावेश आहे. त्याशिवाय करमाळा, बार्शी, माळशिरस, दक्षिण सोलापुरातील कार्यकर्त्यांना संधी देत समन्वय साधण्यात आला आहे.

Solapur BJP
Devendra Fadanvis : अकोला हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल ः उपमुख्यमंत्री फडणवीस

जिल्हा नियोजन समितीची सभा शुक्रवारी (ता.१३) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्या पार्श्‍वभूमीवर या सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे.

Solapur BJP
BJP : `मुंबईत भाजप शतप्रतिशत`

जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (ब्रदर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा भाजप), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ),

प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे (उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू, पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

काही कार्यकर्त्यांची नाराजी

राज्यामध्ये यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्रिपदी दत्तात्रेय भरणे होते. त्या वेळी झालेल्या निवडीनंतर सरकार पडल्यावर रद्द झाल्या.

त्यामुळे आता या नवीन २० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. या समितीला जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच या समितीत येण्यासाठी फिल्डिंग लावली होती. पण काही ठिकाणी अपेक्षित नावे वगळली गेल्याने त्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com