APMC Election Update : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत यंदा मोठे घमासान सुरू झालेले आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Buldana News : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत (APMC Election) यंदा मोठे घमासान सुरू झालेले आहे. बुलडाणा, चिखली या प्रतिष्ठीत बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर ठरवल्याने आरोप होऊ लागले आहेत. सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत ही खेळी खेळल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हा भाजपचा डाव : बोंद्रे

चिखली बाजार समितीत माजी संचालकांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.

या घटनेने खळबळ उडवली. त्यामुळे याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेत हा विरोधकांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान माजी संचालकांचे नामांकन ऐनवेळी बाद करण्याचा निर्णय बेकायदेशीर, चुकीचा व कायद्याच्या दृष्टिकोनातून आश्चर्यकारक देखील आहे, असे ते म्हणाले.

APMC Election
Marathwada Apmc Election : बाजार समिती निवडणुकीची रंगत वाढली, आता लक्ष उमेदवारी अर्ज माघारीकडे

सदर प्रकार हा निवडणुकीला घाबरण्याचा असून जनतेसमोर जाण्याची हिंमत नसल्याचे प्रतीक आहे. सन २०१७ मध्ये बाजार समितीचे तत्कालीन संचालक अ‍ॅड. मंगेश व्यवहारे व विकास डाळीमकर यांनी तक्रारी केल्या होत्या.

ज्या विषयाच्या तक्रारी केल्या त्या विषयांना त्यांनी बाजार समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. तरीही त्या विषयांच्या तक्रारी केल्या. त्या तक्रारीवर चौकशी समिती स्थापन करून तत्कालीन अधिकाऱ्यांनी १९ मुद्दे काढले.

त्यांना उत्तरे दिली. त्यामुळे १५ मुद्दे निरस्त झाले. केवळ ४ मुद्दे कायम राहिले. त्याबाबत अपील करण्यात आले होते.

मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज भरण्याच्या वेळी एक वर्षानंतर विभागीय उपनिबंधकांनी म्हणजे ३ एप्रिल रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निर्णय दिला.

अपिल फेटाळल्यानंतर २ ते ३ तासांतच जिल्हा उपनिबंधकांनी कलम ५३ ‘अ’ अन्वये संचालकांच्या विरोधात आदेश दिला. त्याची प्रत कुठल्याही संचालकांना मिळाली नसली तरी भाजपच्या कार्यकर्त्याला मात्र ती मिळाली. या संचालकांना त्यांची बाजू मांडण्याची, अपील करण्याची संधीही दिली नाही.

APMC Election
Sangli Apmc Election Update : सांगली बाजार समिती निवडणुकीत माजींची पणन संचालकांकडे धाव

विकास विरोधकांच्या पचनी पडला नाही ः बुधवत

बुलडाणा बाजार समितीमध्येही अर्ज नामंजूर झाले. यानंतर माजी सभापती तथा शिवसेने (ठाकरे गट) चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी झालेली विकास कामे विरोधकांना पचनी पडली नाहीत.

बाजार समितीच्या निवडणुकीत समोरासमोर लढण्याची हिंमत त्यांच्यात नसल्यामुळे रडीचा डाव खेळण्यात आला. ७ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप बुधवत यांनी केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी जालिंदर बुधवत यांच्यासह सात जणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहेत.

मी उमेदवार नसलो म्हणजे शिवसेनेचा कुठला उमेदवार नसेल असे होत नाही. सत्तेच्या बळावर काहींनी अक्षरश: धुडगूस घालणे सुरू केला आहे.

निवडणूक राबवणारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असून विरोधी पक्षही दबाव तंत्राचा वापर करून बाजार समिती हातात घेण्यासाठी षडयंत्र करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या विरोधात आम्ही रितसर अपील दाखल केल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com