Aurangabad DPC Meeting : निधी वाटपावरून भुमरे-दानवेंचा राडा, जिल्हा नियोजन बैठकीत बाचाबाची

Aurangabad news : औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वादावादी झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Aurangabad news
Aurangabad news
Published on
Updated on

Sandipan Bhumre vs Ambadas Danve : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एक वर्षानंतरही ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वाद शमला नाही. राज्यभरात अनेक ठिकाणी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. सोमवारी (ता. ७) औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही गटातील नेते आमनेसामने आले. निधी वाटपावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Aurangabad news
Crop Damage Compensation : सरकारला मदत द्यायला भाग पाडू ः दानवे

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींसह आमदार व सदस्य उपस्थित होते.

Aurangabad news
Pune Ring Road : रिंगरोडच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा मोबदला वाटप

बैठकीच्या सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी निधी मिळत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या राजपूत यांनी बैठकीत कागदपत्रे भिरकावली.  यावर पालकमंत्री संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांचा उल्लेख एकेरीत केला.  त्यानंतर दोन्ही गटांमधील नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांमध्ये  वादावादी सुरू झाली. यावेळी दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचे बोलले जात आहे.  

यानंतर काही वेळाने भाजप आमदार हरिभाऊ बागडे  यांनी दोन्ही नेत्यांमध्ये वाद थांबवला. दरम्यान, याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com