भारतीय मजदूर संघाचा २१ डिसेंबरला मंत्रालयावर महामोर्चा

कामगारांच्‍या न्‍याय्य मागण्यांसाठी मंत्रालयावर भारतीय मजदूर संघातर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे.
Bharatiya Majdur Sangh
Bharatiya Majdur SanghAgrowon

जळगाव ः कामगारांच्‍या न्‍याय्य मागण्यांसाठी मंत्रालयावर भारतीय मजदूर संघातर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा २१ डिसेंबरला मुंबईच्‍या आझाद मैदानावरून सुरू होईल, अशी माहिती प्रदेश महामंत्री मोहन येणुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bharatiya Majdur Sangh
Flower Farming : शेतकऱ्यांनी फळबाग, फुलशेतीकडे वळावे

संघाच्‍या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, सचिव विशाल मोहिते, सुरेशचंद्र सोनार, जिल्‍हा सचिव सचिन लाडवंजारी आदी उपस्थित होते. मोहन येणुरे म्हणाले, की कामगारांच्‍या प्रश्‍नांबाबत कामगारांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संघातर्फे ६ नोव्‍हेंबरपासून मजदूर चेतन यात्रा निघाली आहे.

Bharatiya Majdur Sangh
Agriculture Economy : आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यात परंपरेची आडकाठी ?

ही यात्रा शिवनेरी किल्‍ल्‍यावरून सुरू झाली असून, दोन विभागांत महाराष्ट्रातील २१ जिल्‍हे व १२५ तालुक्‍यांतून १७ नोव्हेंबरपर्यंत जाणार आहे. राज्‍यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी योजनांची अंमलबजावणी सुरू करावी, किमान वेतन, बोनस, वेतनवाढ, कामावरून कमी करणे, या तक्रारींवर निर्णय होत नसून ओडिशा, हरियाना‍प्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत निर्णय, तसेच अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com