Agnipath : किसान युनियनकडून 'अग्निपथ'विरोधात आंदोलन

या मेळाव्यात टिकैत यांनी केंद्रासोबत उत्तर प्रदेश सरकारवरही जोरदार टीका केली. 'अग्निपथ' भरती पद्धती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपयुक्त नसल्याचे सांगत टिकैत (Rakesh Tikait) यांनी, या मुद्यावरून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकाराच्याविरोधातील संघर्षाला अजून सुरुवात व्हायची असल्याचे म्हटले.
Rakesh Tikait
Rakesh TikaitAgrowon
Published on
Updated on

केंद्र सरकारकडून भारतीय संरक्षण दलात भरतीसाठी 'अग्निपथ' योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील तरुणांकडून या पद्धतीला विरोध करण्यात येत आहे. या भरती पद्धतीविरोधात ७ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी केली.

बुधवारी (३ ऑगस्ट) बागपत जिल्ह्यातील तिकरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात टिकैत (Rakesh Tikait) बोलत होते. भारतीय लष्करातील भरतीसाठी केंद्र सरकारकडून 'अग्निपथ' योजना राबवण्यात येणार आहे. देशभरात विविध ठिकाणी युवकांकडून या भरती पद्धतीविरुद्ध निदर्शने करण्यात आलेली आहेत.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही 'अग्निपथ' योजनेला विरोध करताना या मुद्यावर देशव्यापी आंदोलन करण्याची गरज यापूर्वी व्यक्त केली होती. त्याला अनुसरून टिकैत यांनी ७ ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेविरुद्ध आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा केली. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ७ ऑगस्टपासून सुरु होणारे आंदोलन पुढे आठवडाभर सुरु राहणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.

या मेळाव्यात टिकैत यांनी केंद्रासोबत उत्तर प्रदेश सरकारवरही जोरदार टीका केली. 'अग्निपथ' भरती पद्धती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपयुक्त नसल्याचे सांगत टिकैत यांनी, या मुद्यावरून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकाराच्याविरोधातील संघर्षाला अजून सुरुवात व्हायची असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्याविरोधात दाखल जुनी प्रकरणे, जुन्या तक्रारी उकरून काढल्या जात आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपची (BJP) सत्ता आल्यावर भाजप कार्यकर्त्यांवर दाखल प्रकरणे मागे घेण्यात आली. शेतकऱ्यांवर दाखल जुने खटले नव्याने उकरून काढले जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप टिकैत यांनी केला.

लखनौ आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवे. तुम्ही विरोधी पक्ष फोडू शकता, विरोधी नेत्यांची ताकद कमी करू शकता, मात्र शेतकऱ्यांचा आवाज बंद करू शकत नाही. शेतकरी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करतील, विविध मुद्यांवर आपला आवाज उठवत राहतील, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला. दरम्यान तिकरी येथील शेतकरी मेळाव्यात टिकैत यांनी, उसाची थकबाकी (sugarcane dues) , वीजदरातील वाढ, भूसंपादनविषयक जाचक नियम अशा अनेक विषयांवरून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com