Bank Loan Pet Animal : पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
Bank Loan Pet Animal
Bank Loan Pet Animalagrowon
Published on
Updated on

Loans Against Cows and Buffaloes : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालनाबाबत नवी एक योजना आणली आहे. भारतात शेतीसोबतच परंपरागत पशुपालन केले जाते. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना शेतीसोबतच पशुसंवर्धनाच्या कामाला चालना देत आहे. यासाठी शासनाने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी गाई-म्हशींवर कर्ज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी बँकेकडून कर्ज देण्याची सुवीधा देण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे या योजनेत तुम्हाला १ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजावर कोणत्याही हमीशिवाय दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधव जनावरे खरेदी करू शकतात.

दरम्यान तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तुम्हाला कर्जाचा पुरवठा होणार आहे. यामध्ये गाय खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारकडून ४० हजार रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते. तर म्हशीसाठी ६० हजार रुपयांचे कर्ज घेता येते. याशिवाय शेळ्या, कोंबड्यांसह लहान जनावरांवरही या योजनेंतर्गत कर्ज मिळते.

Bank Loan Pet Animal
Farm Pond Scheme : नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी

या योजनेअंतर्गत मेंढ्या किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून ४ हजार रुपयांचे कर्ज मिळते. तर तुकोंबडीसाठी ७०० रुपये प्रति कोंबडी या दराने कर्ज घेऊ शकता. एवढेच नाही तर वराह पालन खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला १६ हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते.

या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल

पशुधन खरेदीसाठी बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी, तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. अर्जासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, प्राणी आरोग्य प्रमाणपत्र, पशु विमा प्रमाणपत्र याशिवाय बँक तुमचा क्रेडिट स्कोर देखील तपासून कर्जाची रक्कम ठरवू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com