SMART Cotton : शेतकरी गटाने पिकविलेल्या कापसाच्या बनणार गाठी

स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील मौजे दोनवाडा येथील अहिल्यादेवी होळकर कापूस उत्पादक गटामार्फत उत्पादित कापूस जिनिंग आणि प्रेसिंग करण्यासाठी पाठवण्यात आला.
SMART Cotton
SMART Cotton Agrowon

अकोला ः स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत (SMART Cotton Project) जिल्ह्यातील मौजे दोनवाडा येथील अहिल्यादेवी होळकर कापूस उत्पादक गटामार्फत (Cotton Producer Group) उत्पादित कापूस जिनिंग आणि प्रेसिंग (Cotton Ginning And Pressing) करण्यासाठी पाठवण्यात आला. कापसावर प्रक्रिया (Cotton Processing) करून त्याच्या गाठी तयार केल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातून विविध भागातील शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनासाठी सहभाग घेतला.

SMART Cotton
SMART Cotton : राज्यातील ‘स्मार्ट कॉटन’ची आंध्र प्रदेशला पडली भुरळ

दोनवाडा गावातील अहिल्यादेवी होळकर गटाने उत्पादित केलेला कापूस आपातापा येथील जय गुरू जिनिंग प्रेसिंग येथे गाठी तयार करण्यासाठी आणण्यात आला.

महाकॉट, पियायू व कृषी विभागाच्या सहकार्याने व्यापारी तत्त्वावर कापसाचे गाठींमध्ये मूल्यवर्धन करून थेट लाभ हस्तांतरित करीत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने हा प्रकल्प सुरू केला.

दोनवाडा येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सोमवारी (ता. २३) सहा शेतकऱ्यांनी सुमारे २६० क्विंटल कापूस आणला.

SMART Cotton
Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीन दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चा मानवतमध्ये मोर्चा

या वेळी प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी के. बी. खोत, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, जिल्हा नोडल अधिकारी मनीष मनभेकर, मंडळ कृषी अधिकारी संदीप संखे, प्रदीप राऊत, सिनिअर कॉटन ग्रेटर महाकोट एम. बनचरे, कृषी पर्यवेक्षक सी. पी. नावकार, कृषी सायक धर्मेंद्र राठोड, संतोष मुळे, संजय सावदेकर, अनिल वानखडे, नीतेश घाटोळ, प्रणीत बंड व गटातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी बाजारातील लांब धाग्याच्या कापूस वाणांची लागवड करीत उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्यांनी पहिल्या दोन ते तीन वेचणीचा कापूस दिला. प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २६० क्विंटल आला आहे. आणखी काही शेतकरी येत्या काळात कापूस देणार आहेत. प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या गाठीची विक्री केली जाईल. शेतकऱ्यांना बाजार मूल्यापेक्षा अधिक दर यामुळे मिळू शकेल.

- संतोष मुळे, कृषी सहायक, दोनवाडा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com