Water Tanker : पावसाळ्याच्या तोंडावर धावताहेत साडेतीनशे टॅंकर

नाशिक, ठाणे विभागांत सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा
Water Tanker : पावसाळ्याच्या तोंडावर धावताहेत साडेतीनशे टॅंकर
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Water Defect : पुणे ः मे महिना संपत आला असून, पावसाळ्याचा जून महिना आता सुरू होत आहे. तरीही पाणीटंचाईच्या झळा कमी होत नसल्याची स्थिती आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात जवळपास ३५० टँकर रोज धावत असून, या टँकरद्वारे (Tanker) राज्यातील ४६९ गावे व एक हजार १२७ वाड्या वस्त्यांना रोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने येत्या काळात पाऊस न झाल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात व वाड्यावस्त्यांवर वाढू लागली आहे.

नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, २३ जानेवारीच्या दरम्यान पालघरमध्ये पहिला टँकर सुरू झाला आहे.

त्यानंतर हळूहळू टँकरच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. सध्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागांत पाणीटंचाई नसली, तरी ठाणे विभागात पाणीटंचाईस सुरुवात झाली आहे.

Water Tanker : पावसाळ्याच्या तोंडावर धावताहेत साडेतीनशे टॅंकर
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात साडेचारशे टॅंकर सुरू

गेल्या वर्षी याच कालावधीत ५१५ गावांत व ११८० वाड्यांवर, वस्त्यांवर ४४२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ९२ टँकरने घट झाली असल्याचे समोर आले आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात ३९८ गावांत आणि ९१० वाड्यावस्त्यांवर ३०५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणीटंचाईच्या चांगलीच वाढत होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.

या भागातील ३२ गावे व १२ वाड्यावस्त्यांवर अवघ्या ४१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर उस्मानाबाद भागांत अजूनही टँकर सुरू झाले नसल्याची स्थिती असून, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत.


विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी कमीअधिक पाऊस झाला होता. त्यामुळे या भागात पाणीटंचाई कमीअधिक असल्याने अमरावती विभागात २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नागपूर विभागात अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत.

मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र होणारा अधिक उपसा आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

नाशिक विभागातील ८१ गावे व १३७ वाड्यावस्त्यांवर ९१ टँकर, तर पुणे विभागातील ६३ गावे व २६२ वाड्यावस्त्यांवर ५१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ठाणे विभागातील २६८ गावे व ७१६ वाड्यावस्त्यांवर सर्वाधिक १४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


मागील सहा वर्षांतील गावनिहाय सुरू टँकरची संख्या
वर्ष --- गावे --- वाड्या वस्त्या -- टँकर संख्या
२०२२ --५१५ -- ११८० -- ४४२
२०२१ -- ५३६ -- ९१८ -- ४१६
२०२० -- ८८१ -- १७११ --८०९
२०१९ -- ४९२० -- १०५०६ -- ६२०९
२०१८ -- १५६८ -- १२४६ -- १६२२
२०१७ -- १५५४ -- ३७०५ -- १४५८

जिल्हानिहाय टँकरची संख्या
ठाणे ४४, रायगड ४६, रत्नागिरी १६, पालघर ३४, नाशिक ५५, जळगाव २३, नगर १३, पुणे ३४, सातारा १५, सांगली १, कोल्हापूर १, जालना २५, हिंगोली १२, नांदेड ४, अमरावती ५, वाशीम १, बुलडाणा १७, यवतमाळ ४.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com