Agriculture Education : शेती क्षेत्रातलं शिक्षण घेतल्यावर कोणत्या संधी आहेत ?

गेल्या शंभर वर्षात जग आधुनिक होत गेलं त्याप्रमाणे शेती म्हणावी तेवढी प्रगत झाली नाही. आजही आपल्या जीडीपीचा १७% वाटा हा कृषी क्षेत्राशी संबंधित आहे.
Agriculture Education
Agriculture Education Agrowon

आज कुठल्याही शाळेतल्या पोराला विचारा,मोठा होऊन काय बनणार ? तर  उत्तर येतं पायलट होणार, डॉक्टर इंजिनियर (Doctor) होणार. पण कोणीही असं म्हणत नाही की मी मोठा होऊन शेतकरी होणार. अगदी शेतकरी बापालासुद्धा आपली लेकर मातीतून बाहेर पडवीत असंच वाटतं. दुर्दैवाने आजच्या बहुतांश भारताचं (India) हे भयाण वास्तव आहे. कृषिप्रधान (Agriculture) म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशात ही स्थिती होण्याची अनेक कारणे असली तरी याचं प्रमुख कारण म्हणजे आजच्या मॉडर्न युगात शेतीक्षेत्रात (Agriculture Field) कोणत्या संधी आहेत याबद्दल असलेलं प्रचंड अज्ञान.

गेल्या शंभर वर्षात जग आधुनिक होत गेलं त्याप्रमाणे शेती म्हणावी तेवढी प्रगत झाली नाही. आजही आपल्या जीडीपीचा १७% वाटा हा कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. एकविसाव्या शतकात मात्र सावकाश का होईना कृषिक्षेत्र आपलं रूप पालटत आहे. सतत होत असलेले नवनवीन शोध आणि अत्याधुनिक संशोधनामुळे शेती मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, ज्यामुळे या क्षेत्रात संधीची अनेक द्वार उघडले जात आहेत. ज्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश होतो.  

तसं पाहायला गेल्यावर आजही वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांची स्थिती ही बिकटच आहे. निसर्गाचं बदलत चक्र, पाण्याचे वाढत असलेले दुर्भिक्ष, बेभरवशाचे हवामान अशा विविध कारणांमुळे निर्वाहासाठी शेतीवर विसंबून राहणे हे अवघड ठरत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे होत असलेल्या स्थलांतरामुळे कृषिक्षेत्रातील मनुष्यबळ देखील कमी होत आहे. विशेषतः तरुणाई शेतीपासून दूर झाली आहे. जरी भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही २५ वर्षांपासून कमी वयाची असली तरी शेतीत काम करणाऱ्यांचे सरासरी वय हे वृद्धत्वाकडे झुकलेल्यांचे जास्त आहे.

शेती जर टिकायची असेल तर जे स्वत:ला शेतीत झोकून देऊ शकतील आणि ग्रामीण तरुणांना अधिक प्रगत आणि फायदेशीर शेती पद्धती समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील अशा सुशिक्षित कुशल तरूणांनी कृषिक्षेत्रात येण्याची  गरज आहे. यासाठी अकॅडमिक पातळीवर कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत हेच आज या लेखातून जाणून घेऊ.

शैक्षणिक संधी

कृषी अभ्यासात पदवी/डिप्लोमा कसा मिळवायचा? बी.एस्सी. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन हे कृषी आणि संबंधित क्षेत्रात दिले जाणारे मूलभूत पदवी अभ्यासक्रम आहेत, तर B.SC.कृषि अभियांत्रिकीमध्ये गणित घेऊन बारावी झालेल्या तरूणांना राज्यस्तरीय कॉमन एन्टरन्स टेस्ट देऊन प्रवेश मिळवता येतो. 

2019 पासून कृषी विद्यापीठांमधील UG, (ICAR AIEEA (UG)), PG, (ICAR AIEEA (PG)) आणि ICAR AICE-JRF/SRF (एसआरएफ) पीएचडी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे सोपवण्यात आली आहे. 

Agriculture Education
निकषाच्या बाहेर जाऊन पुनर्वसन करू

तेलंगणात प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, पी.व्ही नरसिंह राव तेलंगणा पशुवैद्यकीय विद्यापीठ, श्री कोंडा लक्ष्मण तेलंगणा राज्य फलोत्पादन विद्यापीठ यांसारख्या कृषि विद्यापीठांमध्ये अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅमसाठी प्रवेश  तेलंगणा राज्य EAMCET मधील कामगिरीवर अवलंबून असतो.

तेलंगणात, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या सुमारे 36 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवल्या जातात. निवडलेल्या उमेदवारांनी SVVU च्या नियंत्रणाखालील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मुथुकूर, नेल्लोर जिल्हा, आंध्र प्रदेश येथे शिक्षण घेणे आवश्यक आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील अनेक विद्यापीठांमध्ये कृषीपदवीच्या अभ्यासक्रमासाठी सशुल्क जागा देखील आहेत. फक्त या राज्यांतील शिक्षणसंस्थामध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या इन्स्टिट्यूटला ICAR द्वारे मान्यता मिळाली आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे.

सध्या अनेक विद्यापीठे आणि पॉलिटेक्निक संस्था या सेंद्रिय शेती, बियाणे तंत्रज्ञान या विषयांमध्ये पोस्ट-सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच  दोन वर्षांचा कृषी डिप्लोमा आणि तीन वर्षांचा कृषी अभियांत्रिकी डिप्लोमा ऑफर करत आहेत.

डिप्लोमा विद्यार्थ्यांना संधी

AgriCET प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून डिप्लोमा विद्यार्थी कृषी विषयात B.Sc करून त्यांचे करिअर पुढे चालू ठेवू शकतात. जे या परीक्षा क्लिअर करता येत नाही ते विज्ञान किंवा समाजशास्त्रात पदवी मिळवून नंतर एमबीए किंवा अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट करू शकतात. यामुळे एंट्री लेवल नोकऱ्यांसाठी कृषी पदवीधरांशी स्पर्धा करण्याच्या त्यांच्या संधी वाढवेल. 

डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी

कृषी पदविका विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून  किंवा सेवेत असताना कृषिअभ्यासक्रमातील पदवी मिळवून किंवा कृषी अधिकारी आणि सलग संवर्ग म्हणून पदोन्नतीसाठी पात्र होऊन थेट कृषी विस्तार अधिकाऱ्यांच्या भूमिकेत सामावून घेऊ शकतात. ज्यांना उच्च शिक्षण घेणे परवडत नाही ते KVK, संशोधन संस्था किंवा खाजगी क्षेत्रातील विस्तार संस्थांमध्ये फील्ड स्टाफ म्हणून सुरवात करू शकतात.

त्यांना योग्य प्रशिक्षणानंतर शेती पर्यवेक्षक, seed multiplication पर्यवेक्षक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कोऑर्डिनेटर म्हणून संधी मिळू शकतात. एमबीए असलेले डिप्लोमा उमेदवार सरकारी संस्थांमध्ये तांत्रिक आणि क्षेत्रीय अधिकारी किंवा खाजगी क्षेत्रात फील्ड/मार्केटिंग/उत्पादन/गुणवत्ता नियंत्रण अधिकारीदेखील बनू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com