Irrigation Project : नांदेड, हिंगोली, यवतमाळच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता

ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्म पेनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रापर्यंत एकूण सात बंधारे प्रस्तावित आहेत. हे सात बंधारे पूर्ण झाल्यास १० हजार ६१० हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली येण्यास मदत होईल.
Water Project
Water ProjectAgrowon

नांदेड : पैनगंगा, पूर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे (Water Bunds) आणि विदर्भ मराठवाड्यातील नद्यांना जोडणाऱ्या पुलांबाबतच्या प्रकल्पांना (Water Project) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.

खासदार हेमंत पाटील (Mp Hemant Patil) यांच्या पुढाकाराने नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी गुरुवारी (ता. १२) बैठक घेण्यात आली.

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव सोळंके, कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ संतोष तिरमनवार आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्म पेनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रापर्यंत एकूण सात बंधारे प्रस्तावित आहेत. हे सात बंधारे पूर्ण झाल्यास १० हजार ६१० हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली येण्यास मदत होईल.

यामुळे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या आदिवासी तालुक्यांचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यांतील १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

या प्रकल्पाला एक महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता देण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले. यासाठी एक हजार ६०० कोटी रुपये खर्च होईल.

Water Project
Water Bunds : दौंडच्या पूर्व भागात सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी

दरम्यान, प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये देण्यात येतील. चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होतील. याचा फायदा मराठवाड्यासह विदर्भातील तालुक्यांना होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com