Paddy Procurement : शहापूरमध्ये दहा भात खरेदी केंद्रांना मंजुरी

दोन हजार ४० रुपये क्विंटलचा भाव; नोंदणी आवश्‍यक
Paddy Procurement
Paddy Procurement Agrowon
Published on
Updated on

खर्डी, जि. ठाणे : भात (Rice) खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळातर्फे (Tribal Development Board) शहापुरात दहा ठिकाणी भात खरेदी (Paddy Procurement) केंद्र सुरू करण्यासाठी सरकारने मंजुरी दिल्याचे शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी भात विक्री करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणी नसल्यास भात खरेदी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Paddy Procurement
Rice Rate : देशातील भात उत्पादनात घट होणार | Agrowon | ॲग्रोवन

तालुक्यातील भातसानगर, खर्डी, सापगाव, मढअंबरजे, आटगाव, डोळखांब, वेहळोली, मुगाव, सावरोली व अघई या दहा ठिकाणी भात खरेदी केंद्राला आदिवासी विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने २०२२ -२०२३ सालाच्या खरीप हंगामासाठी भाताची आधारभूत किंमत साधारण दर्जाच्या भातासाठी २०४० रुपये प्रति क्विंटल तर ‘अ’ दर्जाच्या भातासाठी २०६५ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे.

भात खरेदी ऑफलाईन करावी

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण असल्याने शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे भात खरेदी ऑफलाईन करण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे, अन्यथा शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात भात विकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

१० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच भात खरेदी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

- अविनाश राठोड, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com