Stone Crusher : कुरकुंडीतील ग्रामसभेत खडी मशिनचे अर्ज नामंजूर

खेड तालुक्यातील कुरकुंडी ग्रामपंचायतीमध्ये मागील महिन्यापासून खडी मशिन चालविण्याबाबत पाच कुटुंबीयांचे अर्ज आले होते; मात्र ग्रमसभेत तब्बल ९० टक्के नागरिकांनी खडी मशिनला विरोध दर्शविल्याने हे पाचही अर्ज नामंजूर करण्यात आले.
Stone Crusher
Stone CrusherAgrowon
Published on
Updated on

आंबेठाण : खेड तालुक्यातील कुरकुंडी ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) मागील महिन्यापासून खडी मशिन (Stone Crushing) चालविण्याबाबत पाच कुटुंबीयांचे अर्ज आले होते; मात्र ग्रमसभेत तब्बल ९० टक्के नागरिकांनी खडी मशिनला विरोध दर्शविल्याने हे पाचही अर्ज नामंजूर करण्यात आले.

तसेच या पुढे कुरकुंडी गावामध्ये कधीही कुणाचेही खडी मशिनचे अर्ज कायमस्वरूपी स्वीकारणार नाही, असा ठराव घेऊन इतित्वृत्तामध्ये नमूद करण्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Stone Crusher
Agriculture Export : हातकणंगलेत ‘ड्रायपोर्ट’ उभारू

कुरकुंडी ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. परंतु ग्रामसभेमध्ये खडी मशिन हा वादाचा मुद्दा ठरणार होता.

त्यामुळे पाईट पोलिस दूरक्षेत्रातील रांगडे व सुनील मोरे यांनी तत्परता दाखवत पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामपंचायतीचे कामकाज हे सरपंच सागर जावळे व उपसरपंच काळूराम ऊर्फ सुधीर राळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

Stone Crusher
Highway And Agriculture : राष्ट्रीय महामार्ग अन् शेती

ग्रामसभेत खडी मशिनसाठी आलेल्या अर्जांना मोठ्या संख्येने विरोध करण्यात आला व सर्वांनी सह्याची मोहीम आखून कागदावर आपले नाव व स्वाक्षरी करून विरोध दर्शविला. ज्यांचा विरोध आहे त्या नागरिकांनी हात वर करून मते घेण्यात आली. ९० टक्क्यांपेक्षा नागरिकांनी हातवर करून विरोध दर्शविला.

तसेच गावकऱ्यांना ‘गाव वाचवा शेती वाचवा’ असा आवाज ग्रामसभेमध्ये एक मुखाने मांडण्यात आला. ग्रामसभेचे सचिव तथा ग्रामसेविका सुनीता चौधरी यांच्याकडे देण्यात आले. कुरकुंडीमध्ये कायमस्वरूपात खडी मशिनचे प्रकल्प यापुढे कधीही होणार नाही यासाठी विशेष सहकार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भोकसे, रणजित भोकसे यांचे नागरिकांनी विशेष आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com