अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (Solapur District Co-operative Milk Producers' Association) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. लवकरच या पैशातून पशुखाद्य प्रकल्प (Animal Feed Project ) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली. तसेच संघाच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णयही झाला असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात हा निर्णय झाला.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या आधी २०१३ मध्ये पगारवाढ करण्यात आली होती. तब्बल नऊ वर्षांनंतर ही वाढ करण्यात येत आहे. मार्च २०२२ मध्ये संचालक मंडळ आल्यानंतर २२० कर्मचारी होते, ते आज कमी होऊन १५२ इतकी झाली असल्याने वेतनावरील भार कमी झाला आहे. ही संख्या आम्हाला शंभरावर आणायची आहे, कामगारांचा पगार ९० टक्क्यांपर्यंत तर इतरांचा पगार वेतनानुसार वाढवण्यात येईल, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ३ लाखांचा बोजा वाढणार असल्याचेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.