Nagar News : अतिवृष्टी सततच्या पावसामुळे (Rain) कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Cotton Crop Damage) झाले. आता राज्यात कापूस वेचणीसाठी (Cotton Picking) मजुरांची समस्या निर्माण झाली आहे.
कापूस एकाच वेळी वेचणीला आल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कापूस वेचणीचे दर (Cotton Picking Rate) प्रति किलोला तीन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. कापसाला मिळणाऱ्या दराच्या तुलनेत साधारण १५ ते १७ टक्के रक्कम केवळ वेचणीवर खर्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात साधारण कापसाचे ४५ लाख हेक्टरच्या जवळपास पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, नगर, सोलापूर, खानदेश, जळगाव या भागांत कापूस अधिक प्रमाणात घेतला जातो. अलीकडे पुणे, सातारा, सांगलीच्या काही भागांतही शेतकरी कापसाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. मात्र दरवर्षी परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान होत असल्याचा गेल्या दोन ते तीन वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
या वर्षी परतीचा पाऊस सलग महिनाभर सुरू होता. कापसाची साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांतच वेचणी सुरू होते. कापूस हा टप्प्याटप्प्याने वेचला जातो. यंदा मात्र सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस वेचणी करता आली नाही. कापसाच्या दोड्या ही ऊन नसल्याने फुटल्या नाहीत.
पाऊस गेल्यानंतर कडक ऊन सुरू झाले आणि एकाचवेळी बहुतांश भागात कापूस वेचणीला आला. त्यामुळे कापूस वेचणीला मजूर मिळेल असे झाले आहे.गेल्या वर्षी कापसाचा प्रति किलो नऊ ते दहा रुपये वेचणीचा दर होता. यंदा मात्र हा दर १३ ते १५ रुपयांपर्यंत गेला आहे.
यंदा पावसामुळे कापसाचे अर्ध्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस वेचण्यासाठी मंजूर मिळेल. गेल्या वर्षीपेक्षा तीन ते पाच रुपये किलोला वाढवून द्यावे लागत आहेत. यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे.- सुभाष कर्डिले, कापूस उत्पादक शेतकरी, चांदा, जि. नगर
शाळकरी मुले कापूस वेचणीला
सर्वत्र सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. ज्या भागांमध्ये कापूस उत्पादन घेतले जाते, त्या भागात मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यच कापूस वेचणीला प्राधान्य देत आहेत. त्यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. शाळा सुरू होईपर्यंत शाळकरी मुलांकडून कापूस वेचणी करत मजूर समस्येवर मात करण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अनेक भागांतील चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.