Arctic Ocean : आर्क्टिक महासागरात आता हिममुक्त उन्हाळा

Environment Research : वैश्विक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील हिम आवरण वेगाने नष्ट होऊ लागले असून आगामी २०३० पर्यंत आर्क्टिक महासागर आणि लगतच्या प्रदेशात पूर्णपणे हिममुक्त उन्हाळा अवतरू शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
Arctic Ocean
Arctic OceanAgrowon

News Delhi News : वैश्विक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील हिम आवरण वेगाने नष्ट होऊ लागले असून आगामी २०३० पर्यंत आर्क्टिक महासागर आणि लगतच्या प्रदेशात पूर्णपणे हिममुक्त उन्हाळा अवतरू शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकामध्ये हे ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दक्षिण कोरियातील ‘पोहांग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’मधील येऊन-ही- किम यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले होते.

Arctic Ocean
China Environment : आता चीनला सुचतोय पर्यावरणाचा विचार

काही संशोधकांनी येत्या दहा वर्षांमध्ये पूर्णपणे हिममुक्त आर्क्टिक प्रदेश अवतरू शकतो असे भाकीत वर्तविले होते पण सध्या होणारे हरित गृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण लक्षात घेता ही प्रक्रिया खूप आधीच पूर्ण होईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मागील काही दशकांपासून आर्क्टिक महासागरातील बर्फ खूप वेगाने वितळू लागला असून साधारणपणे २००० पासून ही प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे दिसून येते.

साधारणपणे वर्षभराचा अवधी विचारात घेतला तर आर्क्टिक महासागरातील हिम आवरणामध्ये वाढ होते तसेच काही ठिकाणांवरचे आवरण कमीही होते. हिवाळ्यामध्ये अतिरिक्त हिम आवरण तयार होते त्यामुळे एकूण हिम क्षेत्रामध्येही वाढ होताना दिसते. सप्टेंबरमध्ये मात्र हे क्षेत्र कमी व्हायला लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Arctic Ocean
Global warming : जागतिक तापमानवाढ; पर्यावरणस्नेही पशुपालनाची संधी ?

नेमक्या बदलांचा वेध

आर्क्टिक महासागरातील मानवी हस्तक्षेप वाढला असून ऐंशीच्या दशकापासून एअरोसोल उत्सर्जनामध्ये घट झाली आहे. एल चिकोन या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आर्क्टिक महासागरातील बर्फ खूप वेगाने कमी झाल्याचे दिसून येते. याआधीच्या मॉडेलमध्ये हरितगृह वायूंचा येथील हिम आवरणावर नेमका काय परिणाम होतो?

याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला नव्हता. या संशोधनासाठी उपग्रह निरीक्षणांबरोबरच आधुनिक क्लायमेट मॉडेलचा आधार घेण्यात आला होता. १९७९ ते २०१९ या काळात महासागरातील हिम आवरणामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीचा बदल झाला याचा अभ्यास करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com