Maize Army Worms : मक्यावर अमेरिकन लष्करी अळी

खानदेशातील स्थिती; उत्पादन खर्च वाढला, ५५ हजार हेक्टरवर लागवड
american army worm in maize 
american army worm in maize Agrowon

जळगाव ः खानदेशात यंदा ज्वारीएवढीच मक्याची लागवड (Maize Sowing) खानदेशात झाली आहे. ही लागवड सुमारे ५५ हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवर मका आहे. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव यंदा अधिक आहे. नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे.

american army worm in maize 
धुळ्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

मका पिकास मागील दोन हंगामांत चांगले दर मिळाले आहेत. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण दर चांगले राहिले. या हंगामातही दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. परंतु पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन फवारण्या घेऊनही प्रादुर्भाव थांबलेला नाही. एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च येत आहे. तसेच मजुरी खर्चही लागत आहे.

अमेरिकन लष्करी अळीमुळे पिकाची हानी झाली आहे. त्यात सुरुवातीलाच १५ ते २० टक्के नुकसान झाले आहे. फवारणी वेळेत न घेतल्यास नुकसानीची पातळीही वाढत आहे. पिकाच्या जोमदार वाढीसाठी सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करावी लागते. यामुळे उत्पादन खर्च वाढतच आहे.

american army worm in maize 
मक्यावर अमेरिकन लष्करी अळी

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, धरणगाव, एरंडोल भागांत अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. रब्बी मका पिकात अळी सुरुवातीच्या अवस्थेत आहे. यात नुकसान पातळी कमी वाटत असली, तरी नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांची योग्य मात्रेत फवारणी करावी.
- महेश महाजन, प्रभारी प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल (जि. जळगाव).

पंचनामे करून मदत द्या
मध्यंतरी ढगाळ वातावरण होते. तसेच थंडी कमी आहे. यामुळेदेखील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल स्थिती तयार होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभाग फक्त सर्वेक्षण व आवाहन करीत आहे. यापुढे काही कार्यवाही केली जात नाही. या समस्येला नैसर्गिक आपत्ती मानून त्याबाबत पंचनामे करून मदत देण्याची तरतूद करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com