Sillod Festival : बेकायदेशीर प्रवेशिकांचे वाटप आयुक्तालयातूनच

कृषी आयुक्तालयातील काही संचालकांनी कृषी महोत्सवासाठी देणगी मूल्य असलेल्या अनधिकृत प्रवेशिका विकत घेण्यासाठी अधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

पुणे : सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या (Agriculture Festival) नावाखाली पैसे उकळणाऱ्या अनधिकृत प्रवेशिकांचे वाटप कृषी आयुक्तालयातूनच (Agriculture Commissionerate) केले गेले. मात्र देणग्यांचा हिशेब ठेवण्याचे काम ‘जेके’कडे सोपविले होते, अशी माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

Abdul Sattar
Abdul Sattar : ‘सिल्लोड महोत्सव’ वसुली प्रकरण दणाणले

कृषी आयुक्तालयातील काही संचालकांनी कृषी महोत्सवासाठी देणगी मूल्य असलेल्या अनधिकृत प्रवेशिका विकत घेण्यासाठी अधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका संचालकाने राज्यातील विविध कंत्राटदार संस्थांना लेखी पत्र काढून महोत्सवाच्या प्रवेशिका (पासेस) माझ्या कार्यालयात असून त्या ताब्यात घ्या, अशा सूचना दिलेल्या आहेत.

Abdul Sattar
Abdul Sattar : गायरान जमीन प्रकरणही तापले!

“कृषी आयुक्तालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध कंत्राटदार तसेच सेवा पुरवठादारांना काही दिवसांपूर्वी एकत्र येण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही बैठक असल्याची सुरुवातीला भासवले गेले. प्रत्यक्षात सिल्लोड महोत्सवाच्या प्रवेशिका माथी मारण्यासाठी आम्हाला गोळा केले गेले होते.

मुळात, कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील कृषी आधारित उद्योग क्षेत्रातील संस्था आर्थिक अडचणीत आहेत. त्यात पुन्हा प्रवेशिका घेण्याची सक्ती केली जात असल्यामुळे आम्ही त्रासलेले होते. प्रवेशिका आम्हाला घेण्यास भाग पाडणार असल्यास आमच्या सेवा पुरवठादाराची नोंदणी करतेवेळी कृषी खात्याने स्वतंत्र रक्कम (अनधिकृत शुल्क) घेऊ नये, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. मात्र आमचे ऐकले नाही,” अशी माहिती एका कृषी उद्योजकाने दिली.

Abdul Sattar
Abdul Sattar : सत्तारांची हकालपट्टी करून फौजदारी गुन्हा दाखल करा

कृषी महोत्सव शासनाचा असल्यामुळे सर्व नियोजन शासनाने करणे अपेक्षित होते. तसेच सरकारी महोत्सवात देणगी मूल्य असलेल्या प्रवेशिका कधीही वाटल्या जात नाहीत. सिल्लोड महोत्सवाच्या प्रवेशिकांवर देणगी मूल्यदेखील नमूद केलेले नाही. त्यामुळे आम्ही हा खर्च कंपनीच्या लेखा व्यवहारांमध्ये कसा दाखविणार, असे सवाल आम्ही अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. मात्र आयुक्तालयातून आम्हाला सूचना असल्यामुळे तुम्हाला प्रवेशिका घ्याव्या लागतील, अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली, अशी माहिती एका कंत्राटदाराने दिली.

एका संचालकाच्या म्हणण्यानुसार, ‘प्रवेशिकांचे वाटप आमच्या माथी मारल्याची बाब खरी आहे. तथापि, प्रवेशिकांचे पैसे एकत्रितपणे गोळा करण्याची जबाबदारी संचालकांवर नव्हे तर महोत्सवाशी संबंधित खासगी व्यक्तींकडे दिली गेली होती. तुम्ही औरंगाबादला ‘जेके’कडे पैसे द्या, असे आम्हाला सांगण्यात आले होते.’ त्यामुळे सध्या अधिकाऱ्यांमध्ये ‘जेके’चा बोलबाला आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान, ‘जेके’ ही संस्था नसून दोन व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. “महोत्सवाच्या निमित्ताने अनधिकृत प्रवेशिकांच्या रकमा गोळा करण्यासाठी ‘जेके’ला भेटा, असे निरोप आम्हाला आले होते. ही संस्था नसून जुनेद व कुलकर्णी अशा दोन व्यक्ती आहेत. त्या कृषी खात्याशी संबंधित नसून औरंगाबादमध्ये त्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवेशिकांच्या देणगी मूल्यापोटी गोळा झालेल्या रकमा स्वीकारल्या आहेत. ही माहिती आम्ही कृषी खात्याच्या संचालकांनादेखील सांगितली आहे,” अशी माहिती एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली.

प्रवेशिकांचे नियोजन आयुक्तांच्या संमतीने

“कृषी आयुक्तालयामार्फत प्रवेशिका वाटपाचे नियोजन करण्यास आमचा विरोध होता. मात्र आयुक्तांनी स्वतः यात लक्ष घालून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आमचा नाइलाज झाला. प्रवेशिकांवर कोणतेही मूल्य किंवा क्रमांक नव्हता. त्यातून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, अशी माहितीदेखील आम्ही वरिष्ठांना दिली होती. परंतु त्याकडे डोळेझाक केली,” असा दावा एका सहसंचालकाने केला.

लाखो रुपये गोळा केले?

सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे. त्यासाठी ६०० स्टॉल्स उभारले जाणार आहेत, असा पत्रव्यवहार कृषी खात्यानेच विविध कंपन्या व अधिकाऱ्यांशी केला आहे. ‘स्टॉल उभारण्यासाठी शुअरशॉट इव्हेंट कंपनीशी संपर्क साधा, असा दबाव आमच्यावर आणला गेला. तसेच स्टॉलच्या भाड्यापोटी कंपन्यांकडून लक्षावधी रुपये गोळा केले गेले,” अशी माहिती सूक्ष्म सिंचन उत्पादनातील कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com