Irrigation : नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांत झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे दोन मोठ्या प्रकल्पांसह नऊ मध्यम व ८० लघू प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon

नांदेड : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांत झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे दोन मोठ्या प्रकल्पांसह नऊ मध्यम व ८० लघू प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ६७६.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात शेजारील महत्त्वाचे प्रकल्पही तुडुंब भरल्याने यंदा रब्बीसाठी चांगले दिवस आले आहेत.

Rain Update
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे लहान-मोठ्या नंद्यासह नाल्यांना पूर आला होता. यामुळे पावसाळ्यात संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. जुलै महिन्यात तब्बल ६०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यानंतरही सतत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे.

तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १३४.२९ दलघमीनुसार ९७ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत १३६.६८ दलघमीनुसार ९८.२८ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यांत ३.६२ दलघमीनुसार ४८.६३ टक्के, ८० लघू प्रकल्पांत १७३.१४ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांत १५३.१५ दलघमीनुसार ८०.६९ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ६७६.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ९२.९३ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०३.७७ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्‍वर प्रकल्पात ७९.५० दलघमीनुसार ९८.२० टक्के, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ९६४.१० दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com