Ajit Pawar : ‘नॉट रिचेबल’वरून तर्कवितर्क; अजित पवार यांची नाराजी

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीन वाजल्यापासून संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsAgrowon

Mumbai News राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीन वाजल्यापासून संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले.

पवार यांच्यासोबत आणखी सात आमदारही संपर्काबाहेर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान १८ तासांनी पवार यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडत प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी विश्रांती घेत होतो, अनावश्यक तर्कवितर्कामुळे माझी बदनामी झाली, अशी भूमिका मांडली. (Latest Marathi News)

ते म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. धावपळीमुळे नीट विश्रांती मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातील जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो.

Ajit Pawar News
Ajit Pawar : निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान; कशाचा बोडक्याचा गतिमान!; अजित पवारांची सरकारवर टीका

मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली. शुक्रवारी पुण्यात दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरू होता. मात्र गेले काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो.

या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकूल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, पित्त वाढले.

त्यामुळे शुक्रवारी दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातील ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही मर्यादा असते.

Ajit Pawar News
Ajit Pawar : नाफेडची कांदा खेरदी ताबडतोब सुरू करा; अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

‘शरद पवार सर्वोच्च नेते’

अदानी समूहाच्या चौकशीसाठी संयुक्ती संसदीय समितीची आवश्यकता नसल्याचे शरद पवार यांनी सांगितल्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. याचा संदर्भ घेत विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी, ‘शरद पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखादी भूमिका मांडली की ती आम्हाला मान्य असते. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत कुठलाही फरक असण्याचे कारण नाही.’ असे मत मांडले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com