Old Pension Scheme : शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची संपकरी कर्मचाऱ्यांना साद

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्याच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच विरोधीपक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित केला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Budget Session 2023 : राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे (Hailstorm) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. मात्र, जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.

त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) होत नसल्याचे चित्र आहे. परंतु नैसर्गिक संकटाच्या या काळात माणुसकीच्या भावनेतून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्या-त्या भागातील कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, अशी साद राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घातली.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्याच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच विरोधीपक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित केला.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याला तातडीने मदत करण्याची मागणी पवार यांनी केली.

Ajit Pawar
Ajit Pawar : बाजार समितीतील गैरकारभाराचे अजित पवारांनी काढले वाभाडे

परंतु जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे होत नाहीत.

याच मुद्यावरून अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. पंरतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

Ajit Pawar
Ajit Pawar : "दुधाच्या धंद्यामुळे माझं बस्तान बसलं" - अजित पवार

अजित पवारांची सरकारी कर्मचाऱ्यांना साद

गेल्या सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेले आहेत. या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कोणी नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना तुमचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. परंतु आज नैसर्गिक संकटात शेतकरी सापडला आहे.

या शेतकऱ्याला माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यासाठी त्या-त्या भागातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर येवून पंचनामे करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

दरम्यान, मराठवाडा, नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झाली असून आठ जणांचा मुत्यू झाला आहे. तर शंभरच्या आसपास पशुधनही मुत्यूमुखी पडले आहे. तसेच विदर्भातही वीज पडल्याने जीवित हानी झाली आहे. वादळी पावसामुळे राहती घरे, जनावरांचे गोठे भुईसपाट झाल्याचे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com