Ajit Pawar Latest Update : शेतीमालांचे भाव पडले तरी सरकारचे दुर्लक्ष

Ajit Pawar News : टोमॅटो, कांदा, कापूस यांचे भाव पडल्याने विशेषतः नाशिकमधील कांदा व टोमॅटो पिकविणारा शेतकरी उत्पादक हवालदिल झाला आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : टोमॅटो, कांदा, कापूस यांचे भाव पडल्याने विशेषतः नाशिकमधील कांदा व टोमॅटो पिकविणारा शेतकरी उत्पादक हवालदिल झाला आहे. कापूस केंद्रे कापसाचा भाव पाडत आहेत, तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत केली.

केडगाव, अहमदनगर येथे नऊ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन साजरा होणार होता. मात्र पावसाच्या अंदाजामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘अधिवेशन काळात सभागृहात अनुदान देण्याबाबत जो निर्णय झाला त्या निर्णयाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मध्यंतरी कापसाचे भाव चांगले झाल्याने विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवला होता. परंतु आता भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. कापूस केंद्रे शेतकऱ्यांना कापसाचा भाव पाडून मागत आहेत. मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही.

Ajit Pawar News
Ajit Pawar : तंत्रज्ञानाच्या युगात अपघात हे केंद्र सरकारचे अपयश

आताच्या वादळात केळीच्या बागा व इतर फळबागांचे नुकसान होत आहे. ग्लोबल वॉर्मिगचे संकट घोंघावत आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफमधून मदत होतच असते. पण त्यात शेतकऱ्यांना मदत होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मदत करण्याची गरज असते. सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान होत आहे. यावर मदत करा अशा केवळ स्टँडिंग ऑर्डर दिल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळालेली पाहायला मिळाली नाही.

वर्धापन दिन पुढे ढकलला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र वेधशाळेच्या माहितीनुसार पश्‍चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे.

या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून, तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहितीही पवार यांनी दिली.

Ajit Pawar News
Ajit Pawar Latest News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

जाहिरातींतून जनतेची फसवणूक

पवार यांनी सरकार करत असलेल्या जाहिरातींवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे.’’

पैसे देऊन बदल्या केल्यास प्रामाणिकपणा राहील?

वनविभागाच्या बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत. वास्तविक अधिकारी सांगत आहेत आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील आदेश पाळावेत, असे तोंडी आदेश असल्याचे सांगत आहेत. काही जण परदेशात गेले आहेत.

बदल्या होणे आणि यांनी परदेशात जाणे हा योगायोग आहे का, हा एक संशोधनाचा भाग आहे. राजू शेट्टी यांनी सुद्धा रेटकार्ड मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवले होते. कृषी सहायक पदासाठी रेट तीन लाख रुपये असे प्रसारमाध्यमातून छापून आले आहे. लाखो, करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसे करू शकतील, असा सवालही केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com