Agriculture Department : कृषी अधिकाऱ्यास दुपारी पदोन्नती, संध्याकाळी निवृत्ती

कृषी विभागात महाराष्ट्र कृषी सेवा (गट-अ) कृषी उपसंचालक संवर्गातून अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात पदोन्नतीसाठी कृषी विभागाने तयार केलेल्या २०२१-२२ च्या निवड सूचीस सामान्य प्रशासन विभागाने सहमती दिली होती.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कृषी अधिकाऱ्याला (Agriculture Officer) दुपारी उशिराने बढती मिळाली आणि संध्याकाळी काही तासांत सेवानिवृत्ती पत्करावी लागण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने (Agriculture Department) या अधिकाऱ्याचा सन्मान केला की अपमान, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

कृषी विभागात महाराष्ट्र कृषी सेवा (गट-अ) कृषी उपसंचालक संवर्गातून अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात पदोन्नतीसाठी कृषी विभागाने तयार केलेल्या २०२१-२२ च्या निवड सूचीस सामान्य प्रशासन विभागाने सहमती दिली होती.

अखेर ५ एप्रिल रोजी रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांना सेवानिवृत्तीच्या अंतिम दिवशी ३१ मार्च रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी काढलेला पदोन्नतीचा आदेश दुपारी उशिराने प्राप्त झाला.

त्यानुसार त्यांना नंदूरबार प्रकल्प संचालक (आत्मा) या रिक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. त्याचदिवशी धावपळ करत त्यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतर लगेच ते सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांची थट्टा केली की सन्मान अशी चर्चा आहे.

Department Of Agriculture
Agriculture Department : साखर आयुक्तालयाला मिळाला औट घटकेचा सहसंचालक

संबंधित अधिकाऱ्याला पदोन्नतीनुसार पुढील शासकीय लाभ मिळतील. मात्र या रिक्त पदावर अगोदरच संधी देण्यात आली असती तर त्या पदालाही न्याय मिळाला असता. नंदूरबार येथील आत्मा प्रकल्प संचालक पद दीड वर्षांपासून रिक्त होते हे विशेष.

मागील महिन्यात कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला. त्यांना निवृत्तीच्या आदल्या दिवशी जळगाव येथे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक म्हणून बढती मिळाली होती.

Department Of Agriculture
Agriculture Department : ज्येष्ठता यादीतील वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती

‘कृषी विभागातील अधिकारी नाराज’

एकीकडे कालपर्यंत अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात जागा रिक्त होत्या;तर दुसरीकडे अनेक अधिकारी सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीसाठी पात्र होते. असे असतानाही याबाबत उशिरा निर्णय झाला. आता ही प्रलंबित मागणी मार्गी लागली आहे.

मात्र अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेताना दिरंगाई होत असल्याचा सूर अधिकाऱ्यांमध्ये आहे. ‘‘कृषिमंत्र्यांसह संबंधित यंत्रणेला हा सर्व प्रकार माहिती होता. कृषी विभागातील अधिकारी याबाबत नाराज आहेत. काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी वाट पाहून सेवानिवृत्त व्हावे लागले. ही बाब दुर्दैवी आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com