Mahasul Saptah : कृषी संस्कृती ही महसूल विभागाशी कायमची जोडलेली

Latest Agriculture News ; शेतकरी हा महसूल प्रशासनाचा कणा आहे. कृषी संस्कृती ही महसूल विभागाशी कायमची जोडलेली आहे.
Revenue Department
Revenue DepartmentAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी हा महसूल प्रशासनाचा कणा आहे. कृषी संस्कृती ही महसूल विभागाशी कायमची जोडलेली आहे. हल्लीच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करतांनाच त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील वंदे मातरम सभागृहात सोमवारी (ता. ७) जिल्हास्तरीय महसुल सप्ताहाचा समारोप सोहळा पार पडला. त्यावेळी श्री. आर्दड बोलत होते. या वेळी उत्कृष्ट कार्य करणारे विविध महसूल अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आयुक्त जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Revenue Department
Revenue Department Update : शहाद्यातील दहा मंडळांमध्ये कोतवाल पदे रिक्त

श्री. आर्दड म्हणाले, की महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर रहावे. जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की बदलत्या काळानुसार ई-कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून महसूल अभिलेख अद्यावत व अचूक करावे.

Revenue Department
Mahsul Din : महसूलकडून नवतंत्रज्ञान वापरून सुविधा

अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

सृष्टी इंगळे, नक्षत्रा भदाणे, कुमार सोनटक्के, ओम सवणे, अनुष्का कांबळे या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोतवाल, शिपाई, तलाठी, पोलीस पाटील, लघुलेखक, महसुल सहायक, अव्वल कारकुन यांचा सत्कार करण्यात आला. तेजस्विनी जाधव आणि विजय चव्हाण यांना उत्कृष्ट तहसीलदार, वर्षाराणी भोसले, रामेश्वर रोडगे यांचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला.

सप्ताहाची फलश्रुती

सप्ताहात ८१ ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन देण्यात आली. ९ हजार १११ प्रमाणपत्राचे वितरण झाले. ५६ आधार कार्डची दुरुस्ती, १४ अनाथ प्रमाणपत्र वाटप. एक हात मदतीच्या मध्ये २५४ नागरिकांना लाभ. ९२ लोकअदालतीमधून २ हजार २२४ फेरफार निकाली काढण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षा मार्फत ४४ शिबिरांतून ४ हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. ८८ शेतरस्ते मोकळे करण्यात आले. ‘आपले सरकार’ पोर्टल वर ४३ तक्रारींचे निराकरण. सैनिक कल्याण विभागाचे ३७ प्रकरण निकाली काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com