Nitin Gadkari : कुठले पीक लावावे हा सल्ला कृषी विद्यापीठांनी द्यावा

PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २९) आयोजित शिवारफेरीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Akola News : ‘‘आज बाजारात ज्याची मागणी आहे, असे पीकवाण लावण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना परवडेल. यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घेत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर जागतिक बाजारपेठांचा कल लक्षात घेत शेतकऱ्याने कुठले पीक घ्यावे, याबाबत सल्ला द्यावा,’’ अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २९) आयोजित शिवारफेरीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढावू, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कुलगुरू डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : ‘सिट्रस काँग्रेस’च्या संकेतस्थळाचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

श्री. गडकरी म्हणाले, ‘‘आज सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन आहेत. विद्यापीठाने एक वेबसाइट उघडावी आणि ऑक्टोबर व मे महिन्यामध्ये जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर कोणता स्टॉक किती आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे आणि त्या हिशोबाने क्रॉप पॅटर्न बदलण्याबाबत सल्ला द्यावा.

कोणते पीक, वाण लावण्यामध्ये फायदा आहे याची माहिती द्यावी. कृषी क्षेत्राच्या समस्या हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे. इतर क्षेत्रापेक्षा जीडीपी कमी आहे. ग्रामीण भागात सोयीसुविधा नसल्याने ३० टक्के लोकसंख्या शहरात स्थलांतरित झाली. आज कापूस स्वस्त, कापड महाग आहे. दराचा संबंध मागणी व पुरवठ्याशी निगडित आहे. ज्याला भाव ते पिकवावे लागेल.’’

‘‘राजस्थानमध्ये खाऱ्यापाण्यात झिंग्याची शेती करून शेतकरी लाखो कमवीत आहेत. असाच प्रयोग या भागात करण्याच्या उद्देशाने संबंधित कंपनीसोबत काम सुरु केले आहे,’’ असेही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Raju Shetti Meets Nitin Gadkari : राजू शेट्टींनी घेतली नितीन गडकरींची भेट, साखर निर्यात धोरणावर निर्णय घेण्याची मागणी

मुंडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे हे आपले स्वप्न आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्च कमी करीत किमान ५० टक्के भाव जास्त कसा भेटेल यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यानेही आपल्या शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या काळात तग धरेल अशा पद्धतीचे बी-बियाणे निर्माण करून द्यावे.’’

यंदा शिवार फेरीसाठी २० एकरांवर सुमारे २०० पेक्षा अधिक पीक वाणांचे प्लॉट उभारले आहेत. विद्यापीठाने २०० एकर नापिक जमीन उपजाऊ केली. १६५ एकरांवर नवीन फळबाग उभी केली. नर्सरीत रोप निर्मितीच्या कामाला वेग दिला आहे, असे डॉ. गडाख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com