Power Generation : दोन हजार ८०० मेगावॉट ऊर्जा निर्मितीसाठी करार

Electricity : राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार करण्यात आला.
Electricity | Power Generation
Electricity | Power Generation Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार टाटा पॉवर कंपनी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे १ हजार मेगावॉट तर पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिरवटा येथे १ हजार ८०० मेगावॉट या दोन ठिकाणी एकूण २८०० मेगावॉट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ६ हजार इतकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्म‍िती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजित पाटील उपस्थित होते.

Electricity | Power Generation
Chikotra Dam Power Generation : ‘चिकोत्रा’तून ४१ लाख युनिट वीजनिर्मिती

भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत. २ हजार ८०० मेगावॉटच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मागील काळात उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र सरकारने अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत.

महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यासाठी राज्य सरकारने चांगले धोरण तयार केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

Electricity | Power Generation
Solar Power Generation : नांदेडला १०१६ मेगावॉट सौरवीज निर्मिती होणार

टाटा पॉवरने हा सामंजस्य करार कृतीत आणून वेगाने काम सुरू करावे. यासाठी वैधानिक मान्यता आणि सर्व मदत करण्यास राज्य सरकार तयार आहे. टाटा पॉवर महाराष्ट्रात काम करतेच आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे काम सुद्धा टाटा पॉवर कंपनी त्यांच्या नावाला साजेसे करतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

उदंचन जलविद्युत प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेज प्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर जलविद्युत निर्म‍ितीसाठी केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com