Agriculture Electricity शिक्रापूर, जि. पुणे ः कृषिपंप (Agriculture Pump) वीजबिलमुक्तीसाठी (Electricity Bill) संजय पाचंगे यांनी आंदोलन सुरू केले असून, दर तीन महिन्यांनी सरासरी १३ कोटी युनिट एवढी वीज महावितरण (Mahavitaran) शिरूरच्या शेतकऱ्यांकडून जादा वापर दाखवून वसूल करीत असल्याचा दावा केला आहे.
हा दावा त्यांनी महावितरणकडूनच उपलब्ध कागदपत्रांवरून केला असून, या घोटाळ्याबद्दल महावितरणच्या कनिष्ठ-वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार शिरूर व शिक्रापूर पोलिसांकडे दाखल केली आहे.
गुन्हे दाखल न केल्यास बुधवारपासून (ता. ८) शेतकऱ्यांसह अर्धनग्न बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
हा दावा त्यांनी महावितरणकडूनच उपलब्ध कागदपत्रांवरून केला असून, या घोटाळ्याबद्दल महावितरणच्या कनिष्ठ-वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार शिरूर व शिक्रापूर पोलिसांकडे दाखल केली आहे.
गुन्हे दाखल न केल्यास बुधवारपासून (ता. ८) शेतकऱ्यांसह अर्धनग्न बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरूरच्या सर्व शेतकऱ्यांसह वीजबिलमुक्तीसाठी आंदोलन सुरू केले आहे. यातील पहिल्या टप्प्यात त्यांनी महावितरण ज्या पद्धतीने कृषिबिल आकारणी, अनुदान, वीजबिल वसुली व सदोष वीजवाटप करते आहे, त्याची गेली तीन वर्षांतील माहिती काढली असून त्यानुसार त्यांनी हा दावा केला. .
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या बिलांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीचा तक्रार अर्ज शिरूर व शिक्रापूर पोलिसांकडे दाखल केला आहे. याबाबतची माहिती पांचगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजप माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, डॉ धनंजय खेडकर, गणपतराव फराटे, किसान आघाडीचे ठकसेन ढवळे, लक्ष्मण भगत, बापूसाहेब काळे, नवनाथ भुजबळ, विठ्ठल वाघ, गोपाळ भुजबळ, चिंतामणी ढमढेरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान महावितरणच्या शिरूर व शिक्रापूर उपविभागीय कार्यलायातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सर्वांनीच नकार दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.