Agriculture Department : कृषी विभागातील लिपिकांचे आंदोलन

लिपिकसंवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी संघटनेने तीन टप्प्यांत आंदोलनाची नोटीस दिली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on: 
Updated on: 

Yavatmal News लिपिकसंवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी संघटनेने तीन टप्प्यांत आंदोलनाची नोटीस दिली आहे. येत्या १० मेपासून आंदोलन करण्यात येईल. २१ मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून कामबंद आंदोलन केले जाईल.

कृषी विभागातील लिपिकवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यात प्रस्तावित आकृतिबंध तयार करावा, क्षेत्रीयस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्गाची संख्या पाहता विभागीय कृषी सहसंचालक ठिकाणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, कृषी आयुक्तालय व महसूल विभागाचे धर्तीवर लिपिक संवर्गातील केवळ कनिष्ठ लिपिक हेच पद सरळ सेवेने भरले जाते.

Agriculture Department
Agriculture Department : चार वर्षांनंतर ‘आत्मा’ला मिळाले पूर्णवेळ प्रकल्प संचालक
Agriculture Department
Agriculture Department : खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने जागृती करावी

प्रतिनियुक्तीवरील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक ही पदे सरळसेवेऐवजी पदोन्नतीनेच भरण्यात यावीत, प्रतिनियुक्तीवरील १०२ पदे शासनाकडून चिन्हांकित करून तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, सहायक अधीक्षक व वरिष्ठ लिपिक पदांचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी, आदी अनेक मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाची नोटीस दिली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास १० ते १२ मे कृषी आयुक्तालय पुणे येथे धरणे आंदोलन, १५ ते १९ मे धरणे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेचे अध्यक्ष जाकीर हुसेन, आशीष कोडावार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com