Amravati News: पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन

राज्यात लक्षावधी शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरण्यात आला. मात्र संततधार पाऊस, अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असताना देखील विमा कंपनीकडून भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
Crop Insurance Amravati News
Crop Insurance Amravati NewsAgrowon

Amravati News: पीक विमा कंपनीकडून (Crop Insurance Company) विमा भरपाईस टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भाने सरकारने कंपनीस आदेश द्यावा, अन्यथा या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनाप्रणित (Swabhmani Shetkari Sanghtana) स्वाभिमानी पक्षाकडून तीव्र आंदोलन (Protest) केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

स्वाभिमानी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आढाव यांच्या नेतृत्वात पीक विमा भरपाईच्या मुद्द्यावर भातकुली तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

या वेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून सक्षम भरपाई न मिळाल्यास स्वाभिमानी पक्षाच्या वतीने येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, राज्यात लक्षावधी शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरण्यात आला. मात्र संततधार पाऊस, अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असताना देखील विमा कंपनीकडून भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

काही शेतकऱ्यांना देण्यात आलेली भरपाई देखील तुटपुंजी आहे. भरलेल्या वीमा हप्त्यापेक्षा देखील ती कमी असल्याचा आरोप मोहोड यांनी केला.

पोस्ट हार्वेस्टिंग या निकषाखालील भरपाई बाबत देखील विमा कंपनी गंभीर नसल्याचे दिसून येते. या सर्वांवरून विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे सिद्ध होते.

कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करावी. त्या आधारे विमा कंपन्यांना भरपाई देण्यास बाध्य करावे.

Crop Insurance Amravati News
Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

ज्यांना रक्कम कमी मिळाली किंवा ज्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांच्या खात्यातही विमा रक्कम जमा करावी. त्याकरिता सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी या वेली करण्यात आली.

आंदोलनात अमोल राऊत, शिवाजी देशमुख, आश्विन दुर्गे, बाळासाहेब खोरगडे, प्रदीप गौरखेडे, नितीन ओळीवकर, राजीव लेंडे, विशाल मेहरे, बाळासाहेब लेंडे, मुकुंद बांबल, संदीप वानखडे, संदीप रेहपाडे, ओंकारराव ठाकरे, वसीम भाई, मोहन धुमाळे, श्रीकृष्ण बैलमारे सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com