Vulture Conservation : ॲसिक्‍लोफेनाक औषध जनावरांमध्ये वापरावर बंदी

Aceclofenac Medicine : गिधाड लोप पावत असल्याची केंद्राकडून गंभीर दखल
Vulture Conservation
Vulture Conservation Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Animal Care : नागपूर ः उघड्यावरील मृत जनावरांचे मांस गिधाड फस्त करतात. परंतु या जनावरांना जीवंत असताना उपचारादरम्यान देण्यात येणारी औषधे मांसासोबत पोटात गेल्याने गिधाडांच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊन दगावण्याचे प्रकार घडले आहेत. ही बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेत अशा प्रकाराला कारणीभूत ठरणाऱ्या ॲसिक्‍लोफेनाक या औषधी घटकाचा जनावरांच्या उपचारासाठी वापर करण्यावर बंदी घातली आहे. याविषयीचे राजपत्र प्रकाशीत करण्यात आले आहे.

पशुवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲसिक्‍लोफेनाक हा घटक अंगदुखीवर प्रभावी ठरतो. त्यामुळे जनावरांना हे औषध म्हणून दिले जाते. टॅबलेट, इंजेक्‍शन आणि द्रव औषधी स्वरूपात हे औषध उपलब्ध आहे. जनावर काही कारणामुळे दगावल्यास ते गावाबाहेर माळरानावर उघड्यावरच टाकून दिले जाते. उघड्यावर टाकलेल्या मृत जनावरांचे मांस गिधाडे खातात. परंतु मृत जनावरास ॲसिक्‍लोफेनाक हे औषध दिलेले असल्यास आणि अशा जनावरांचे मांस खाल्ल्यास गिधाडाच्या किडनीचे काम बंद पडल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. या कारणामुळे देशांतर्गंत गिधाडांची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण आणि अभ्यास नोंदविण्यात आला. त्याचा आधार घेत ॲसिक्‍लोफेनाक या औषधी घटकाचा जनावरांच्या उपचारासाठी वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


Vulture Conservation
पंजाबमध्ये 'पाणी'दार वाणांच्या वापरावर बंदी

मृत जनावरांचे मांस खाल्ल्यानंतर गिधाडाच्या किडनीचे कार्य बंद पडते, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो, असे निरीक्षण अभ्यासाअंती नोंदविण्यात आले. सध्या देशभरात गिधाडांची संख्या कमी झाल्याची नोंद आहे. गिधाडाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या ॲसिक्‍लोफेनाक या औषधी घटकाच्या वापरावर बंदी आणली गेली आहे. त्यासंबंधीचे राजपत्रही केंद्र सरकारने प्रकाशीत केले आहे. दहा वर्षांपूर्वी डायक्‍लोफिनॅक या औषधावर अशाच कारणासाठी बंदी आणली गेली होती.
- डॉ. सुधीर राजूरकर,
विभाग प्रमुख,औषधी शास्त्र विभाग
पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com