
सातारा : जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते (Fertilizer Stock) उपलब्ध असून, सध्या कृषी सेवा केंद्रात ४६ हजार १७७ टन खतसाठा (Fertilizer) उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे.
खतांमध्ये युरिया साठा (Urea Stock) १३ हजार ३४० टन, डीएपी चार हजार ८२७ टन, एमओपी- एक हजार १६ टन, संयुक्त खते-१९ हजार ४१९ टन व सुपर फॉस्टेज सात हजार ५३१ टन कृषी सेवा केंद्रात विक्रीस उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कृषिक विभागाने कृषिक ॲपच्या माध्यमातून खत उपलब्धततेची माहिती दररोज अपडेट करण्यात येते.
स्मार्टफोन कृषिक ॲप डाउनलोड करून खत उपलब्धता या आयकॉनवर क्लिक करावे. आपल्या तालुक्याची निवड केल्यानंतर जिल्हा व तालुक्यातील सर्व कृषी केंद्रचालकांनी यादी उपलब्ध आहे. नजीकच्या कृषी केंद्रावर क्लिक केल्यास त्या विक्री केंद्रास उपलब्ध खतसाठ्याची माहिती पाहता येईल.
शेतकऱ्यांनी एखाद्या विशिष्ट खतालाच प्राधान्य न देता पर्यायी खते वापरण्याकडे आपला कल वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माती परीक्षण करून जमिनीचा पोत सुधारेल व पिकांना आवश्यक घटक मिळतील अशीच खते वापरणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा मागणी आवश्यकप्रमाणे रास्त दराने करावा, असेही आवाहन श्री. माईनकर यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.