Ethanol Production : शेतकरी अन्नदाताच नाही, तर ऊर्जादाता व्हावा

‘‘देशात इंधनासाठी इथेनॉल वापर वाढवणार आहोत. त्यामुळे साखर कारखानदारांनी आकार कमी इथेनॉल अधिक तयार करावे.
Ethanol
Ethanol Agrowon

नगर : ‘‘देशात इंधनासाठी इथेनॉल वापर वाढवणार आहोत. त्यामुळे साखर कारखानदारांनी (Sugar Factory) आकार कमी इथेनॉल (Ethanol) अधिक तयार करावे. येणाऱ्या काळात शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे,’’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नगर हे आता खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे, असे गडकरी म्हणाले.

नगरमध्ये ३३१ कोटी १७ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिमोट दाबून डिजिटल पद्धतीने शनिवारी करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे यांची उपस्थिती होती.

नितीन गडकरी म्हणाले, ‘‘उड्डाणपूल पूर्ण झाल्याचा आनंद आहे. नगर जिल्ह्यामध्ये केवळ २०२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता. आज तो १०७१ किलोमीटर होऊन महामार्गात ४३१ टक्के वाढ झाली आहे. ८ वर्षांत ३६ कामे मंजूर करण्यात आली. ५ हजार १८० कोटी रुपयांची ७०० किलोमीटरची लांबी आहे. नगर जिल्ह्यात १३ कामे पूर्ण झाली, ६ कामे प्रस्तावित आहेत. त्याची लांबी ३८० किलोमीटर, किंमत १७ हजार २२८ कोटी रुपये आहे. ’’

Ethanol
Rabi Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू

अनिल राठोड यांचा उल्लेखही नाही

नगरमध्ये झालेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत सर्वच नेत्यांनी गांधी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. मात्र नगर शहरातील माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचेही या कामासाठी योगदान असल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. मात्र, उद्घाटन कार्यक्रमात राठोड यांचा साधा उल्लेखही केला गेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com