Fertilizer Stock : पुणे जिल्ह्यातील युरिया, डीएपी खताचा ९०० टन संरक्षित साठा मुक्त

Kharif Season : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० टन संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Fertilizer Use : पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामात (Kharif Season) शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० टन संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे.

संरक्षित साठ्यामधून १०० टक्के डीएपी व ५० टक्के युरिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.

तसेच, जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील पट्ट्यामधील भात लागवड सुरू असल्याने व जिल्ह्यातील उर्वरित भागात पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरण्यांची कामे चालू असून खताची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने वितरण व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Fertilizer
Fertilizer Stock : सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध

जिल्ह्यातील तालुकानिहाय संरक्षित साठा (टनांमध्ये)
आंबेगाव - युरिया ११६.१०० टन, डीएपी ५०.२००
मुळशी - युरिया ५४.९००, डीएपी ३०
जुन्नर - युरिया १०१.२५०, डीएपी ८५
मावळ- युरिया १६२.९००, डीएपी ५५

खेड - युरिया ११४.०७५, डीएपी. ७८,
शिरूर- युरिया १२५.७७५, डीएपी १००
दौंड - युरिया १६४.४७५, डीएपी १०१,
पुरंदर - युरिया ७४.७००, डीएपी ५३

हवेली ः युरिया ३९.६००, डीएपी २०
भोर- युरिया ७५, डीएपी ४९
वेल्हा- युरिया ४०.९५०, डीएपी २०
इंदापूर - युरिया १४१.९७५, डीएपी १४४
बारामती ः युरिया १४९.६२५, डीएपी १२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com