Kharif Sowing : पुणे विभागात ९ टक्के पेरण्या

Kharif Season 2023 : जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे पेरणीस सुरुवात झाली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on: 
Updated on: 

Pune News : जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे पेरणीस सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी ९५ हजार ९२० हेक्टर म्हणजेच ९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

यामध्ये पुणे, सोलापूर जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी नगर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

पुणे विभागात जूनमध्ये नगर जिल्ह्यात सरासरीच्या १०८.२ मिलिमीटरपैकी ५८.० मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के पाऊस पडला. तर पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या १०२.५ मिलिमीटरपैकी २८.८ मिलिमीटर म्हणजेच २८ मिलिमीटर पाऊस पडला.

Kharif Sowing
Kharif Sowing : खानदेशात पेरणीला गती

तर ६ जुलैपर्यंत नगरमध्ये १४ मिलिमीटर, पुणे ४३.३, सोलापूरमध्ये २२.७ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ तालुक्यांमध्ये जोरदार तसेच वेल्हे तालुक्यात अतिजोरदार पर्जन्याची नोंद झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

यंदा हवामान विभागाने ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसास सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावलेली नव्हती.

त्यामुळे सर्वच ठिकाणी खरिपातील पेरण्या रखडल्याने खरीप वाया जातो की काय अशी धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली होती. जूनच्या अखेरीस पावसास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करण्यास सुरुवातही केली होती.

Kharif Sowing
Kharif Sowing : परभणी जिल्ह्यात खरिपाची ३८.७० टक्के पेरणी

सध्या नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसला तरी अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात सुमारे १६०० हेक्टवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. इतर भागात बाजरी, मका, तूर, सोयाबीन व कापूस पिकाची अल्प पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातही बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मका, कापूस, सोयाबीन, उडीद या पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ८०,५३८ -- १४

पुणे --- १,९५, ७१० -- ११,७८२ --- ६

सोलापूर --- २,८९,५७० -- ३६०० -- १

एकूण --- १०,६५,०४८ -- ९५,९२० --९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.